Saturday, September 23, 2023
Homeदेशराष्ट्रवादी कडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा...

राष्ट्रवादी कडून मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला, सांगलीतील कॉलेज कॉर्नर चौक येथे राष्ट्रवादी च्या युवक व बांधकाम कामगार सेल च्या पदाधिकारी यांनी केक कापून साजरा केला व विकास, रोजगार, अच्छे दिन, पंधरा लाख असे आशय लिहलेले फुगे हवेत सोडण्यात आले.

यावेळी बांधकाम कामगार सेल चे शहरजिल्हाध्यक्ष विनायक हेगडे म्हणाले की, आज आम्ही पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणूज साजरा करत आहोत, गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांनी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार असे आश्वासन दिले होते, वेदांत सारख्या कंपन्या महाराष्ट्रातुन बाहेर नेल्या, पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणार असे ही आश्वासन दिले होते,

पेट्रोल, गॅसची दरवाढ व महागाई चालूच आहे त्यामुळे मोदींनी पुढच्या वर्षी बेरोजगारी दूर करावी व त्यांनी ही भारतातून दूर जावं अश्या शुभेच्छा आम्ही देत आहोत,असे ते म्हणाले. यावेळी विनायक हेगडे, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, अमित चव्हाण, राहुल यमगर ,राजू कांबळे, कबीर व्हनकटे,सागर ऐवळे, गणेश हाताळे संजय कांबळे, गणेश सनदी आदी पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: