Friday, February 23, 2024
Homeराज्यसुरज फौंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली शिक्षण समूहा तर्फे अभूतपूर्व अमृत महोत्सवी भव्यदिव्य...

सुरज फौंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली शिक्षण समूहा तर्फे अभूतपूर्व अमृत महोत्सवी भव्यदिव्य रॅलीचे आयोजन…

Share

सांगली – ज्योती मोरे

सुरज फौंडेशन समूहाच्या वतीने नव कृष्णा व्हॅली शिक्षण संस्थेमार्फत काढण्यात आलेल्या अमृत महोत्सव रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व मेडिकल व आय आय टी अकॅडमी चे 550 विद्यार्थी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन व प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक राज्याची वेशभूषेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत व स्कूल विद्यार्थी बँडच्या तालावर देशभक्तीपर गीत गात घोषवाक्ये देत रॅलीमध्ये सहभागी झाले.

नव कृष्णा व्हॅली स्कूलचे विद्यार्थी सुरुवातीस बँड ग्रुप त्यानंतर मल्टी स्किल व्हॅन त्यामध्ये विविध कारागिराच्या प्रात्यक्षिकासह या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधीं, शासकीय अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व सांगलीकर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित होते.सांगली शहरातील राम मंदिर चौकातून या अमृत महोत्सव रॅलीला प्रारंभ झाला. मा. सुनील पवार आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे नवनियुक्त यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून मार्गक्रमण करण्यात आली.

त्यांनी विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचा मान राखून देशाभिमान जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत दिग्विजय सूर्यवंशी महापौर यांनी संस्थेचा उपक्रम हा देशभक्ती जागृत करण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम आहे असे सांगितले. बजरंग पाटील शिवसेना जिल्हा संघटक ,यशवंत तोरो चेअरमन नव कृष्णा व्हॅली स्कूल हे उपस्थित होते.

पुढे देशभक्तीपर आणि राष्ट्राच्या जय जय कार घोषणा देत ही आकर्षक रॅली पुढे सरकत राहिली.मुलांनी वेगवेगळ्या थोर व्यक्तींच्या वेशभूषा साकारल्या होत्या तसेच कडक शिस्त या पार्श्वभूमीवर अत्यंत उत्साही वातावरणात रॅलीला प्रारंभ झाला.पुष्पराज चौक या ठिकाणी शिक्षण विभाग उपसंचालक कोल्हापूर माननीय महेश चोथे यांनी रॅलीचे स्वागत केले व संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील कार्याला शुभेच्छा दिल्या.

मिरज मेडिकल कॉलेज चे डीन डॉक्टर रुपेश शिंदे यांनी या ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणाला लावलेल्या क्रांतिकारकांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला व विद्यार्थ्यांच्या मध्ये देशभक्ती जागृत केली. मुलांना देशाविषयी महत्त्व कसे जोपासावे हे पटवून दिले. त्यानंतर पुष्पराज चौक, मार्केट यार्ड मार्गे ही रॅली विश्रामबाग चौक इथे मार्गक्रमण करण्यात आली.

जिल्हा पोलीस मुख्यालयात पोहोचली या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे , एमआयडीसी पोलिस निरीक्षक अविनाश पाटील,पोलीस सब इन्स्पेक्टर वेल्फेअर सांगली अकिब काझी, ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी माधवराव माने,कानडवाडी सरपंच अनिल सेगुनशे ,किशोर लुल्ला,बन्सी काका ओस्तवाल,या रॅलीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. उपस्थितांनी मुलांना मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी क्रांतिवीरांनी आपले प्राण कसे पणाला लावले व देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली स्वातंत्र्य लढ्याचे प्रत्यक्ष वर्णन त्यांनी केले.ज्यांच्या संकल्पनेतून ही अमृत महोत्सव रॅली आयोजित करण्यात आली ते नव कृष्णा व्हॅली शिक्षणासमूहाचे संस्थापक प्रवीणशेठ लुंकड या संस्थेचे सचिव कामत सर,नव कृष्णा व्हॅली स्कूलच्या प्राचार्या व सुरज फौंडेशनच्या संचालिका सौ. संगीता पागनीस,

नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यम स्कूलचे प्राचार्य अधिकराव पवार सुरज फौंडेशन च्या एच. आर .गीतांजली पाटील/ देशमुख , नव कृष्णा व्हॅली स्कूल उपप्राचार्य प्रशांत चव्हाण,सहेली ग्रुपच्या सौ.योगेश्री सूर्यवंशी, नव कृष्णा व्हॅली गुरुकुल विभागाचे प्रमुख श्री. संतोष बैरागी एन्क्रीश वेब टेक चे डायरेक्टर राजेंद्र पाचोरे अकाउंट विभागचे प्रमुख श्रीशैल मोटगी सुरज स्पोर्ट्स अकॅडमी चे इन्चार्ज विनायक जोशी थ्रीडी विभाग प्रमुखाचे श्री दत्तात्रेय मुळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग , माय एफ ची टीम,त्याचबरोबर विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका सौ सुनीता भोसले व शीतल भाकरे यांनी केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: