Monday, May 6, 2024
Homeराज्यनव कृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल...

नव कृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सुरज फाउंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का राजेंद्र चिंबळकर आणि ओम अनिल सिसाले 90.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, कुमार वरुण दत्तात्रय बोराटे हा विद्यार्थी 89.20%टक्के गुण मिळवत द्वितीय आला.तर कुमार अथर्व विलास धडस हा विद्यार्थी 87.40% गुण मिळवत तृतीय आला आहे.

शाळेच्या 19 विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य व 13 विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय व उत्कृष्ट 100%निकालाची परंपरा कायम राखली आहे..

शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठजी लुंकड, सचिव एन. जी.कामत संचालिका, प्राचार्या संगीता पागनीस उपप्राचार्य प्रशांत चव्हाण सर सुरज फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका सुनीता पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: