Sunday, May 12, 2024
Homeराज्यभविष्याकडे वेध घेणारी नव कृष्णा व्हॅली स्कूल “लक्ष दिव्यांनी उजळली दिशा, घेऊन...

भविष्याकडे वेध घेणारी नव कृष्णा व्हॅली स्कूल “लक्ष दिव्यांनी उजळली दिशा, घेऊन नवी उमेद नवी आशा”…

Share

सुरज फौडेशन तर्फे आपणा सर्वाना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा – मा.श्री.प्रविण सूरजमलजी लुंकड…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फौंडेशन संचलित विविध शाखांव्दारे शैक्षणिक विस्ताराचे कार्य अविरतपणे सुरू असून सध्या नव कृष्णा व्हॅली स्कूल एम.आय.डी.सी. कुपवाड / सांगली / म्हैसाळ, कलानगर विजय नगर व( कोल्हापूर )उत्तुर,तासगाव येथे विद्यादानाचे कार्य अविरत सुरू आहे. सुरज फौंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्ष कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत आहे.

तसेच या संस्थेच्या प्रगतीचा आलेख प्रत्येक वर्षी वाढतच चाललेला आहे. या संस्थेत १८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुरज फौंडेशनच्या सर्व शाळांनी आपल्या इ. १० वी व १२ वी परीक्षांचा निकालांची परंपरा १००% राखली आहे.

कृतीयुक्त शिक्षण : केवळ पुस्तकी ज्ञान न देता कृतियुक्त शिक्षण नव कृष्णा व्हॅली स्कूल च्या प्रि-प्रायमरी मधील विद्यार्थ्यांना दिले जाते.
मल्टीस्कील ट्रेनिंग सेंटर : विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा आणि मेक इन इंडिया उपक्रमास प्रतिसाद म्हणून विविध कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत अॅग्रीकल्चरल इलेक्ट्रीकल, कारपेंटरी आणि हेल्थ अॅण्ड होम सायन्सचे मुलभूत कौशल्य विकास शिक्षण देण्यात येते.

तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये रोबोटिक्स थ्रीडी प्रिंटिंग आणि ड्रोन डिव्हिजन याची सुरुवात करण्यात आली आहे या अंतर्गत विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख तसेच स्वतः त्यामध्ये अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळत आहे सध्याच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स 3d प्रिंटिंग ड्रोन अशा सर्व तंत्रज्ञानाची अच्युतम गरज निर्माण झाली आहे हीच गरज पूर्ण करण्यासाठी सुरज फाउंडेशन चे संस्थापक प्रवीणजी लुंकड यांच्या दूरदृष्टीतून पाच वर्षांपूर्वीच या विभागाची सुरुवात करण्यात आली याही पुढे जाऊन इनोवेशन हब ही संकल्पना देखील आता आकार घेत आहे या इनोवेशन हब मध्ये विद्यार्थ्यांना संशोधनाची तसेच दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या उपकरणांची निर्मिती करण्याची संधी मिळणार आहे.

नव कृष्णा व्हॅली वसतिगृह : दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नव कृष्णा व्हॅली वसतिगृहाची भव्य सर्व सोयींनी युक्त अशी इमारत उभी केली आहे. सध्या या वसतिगृहात महाराष्ट्र व इतर राज्यातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थीना आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्यात येत आहे. या निवासी शाळेत निवास व भोजनाची उत्तम सोय असून अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होत आहे.

अपघाती विमा संरक्षण : सुरज फौंडेशन शैक्षणिक संस्था विद्यार्थी, पालक, शिक्षक व फौंडेशनचे सर्व कर्मचारी यांचा अपघाती विमा उतरविला जातो. अनेकांना अपघाती विम्याचा लाभ मिळाला आहे.

प्रिझम ॲप : पालकांना घरबसल्या विद्यार्थ्यांची हजेरी, परीक्षा वेळापत्रक, शालेय विविध कार्यक्रम व सुट्टयांची महिती अभ्यासक्रम विद्यार्थ्याना अॅप्सव्दारे दिली जाते.

GPS System – बसमध्ये मुलांच्या सुरक्षितेतसाठी GPS System राबवली आहे. मुलांच्या सुरक्षितेतसाठी CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम :- अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये MS-CIT, C++, MS.Office, इ.कोर्स आहेत. या ज्ञानाचा उपयोग त्यांना स्पर्धा परीक्षामध्ये होतो. अबॅकस व वेदिक मॅथ्स शिकविले जाते. एलिमेंटरी व इंटरमीजिएट परीक्षेचे केंद्र आहे.. M.T.S, N.T.S, MKCL, टिळक, जिनियस, राष्ट्रभाषा इ. बाह्यपरिक्षा घेतल्या जातात. स्कॉलरशिप साठी वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.

सूरज ललित कला अॅकॅडमी : सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन, प्रबोधन व सेमिनार करीता सांगलीत आदर्श ठरेल अशी सर्व सोयी नियुक्त प्रशस्त मिनी थिएटरची व्यवस्था आहे.

सामाजिक उपक्रम : संस्थेमार्फत प्रतिवर्षी ….वृक्षारोपण, व्यक्तीमत्व विकास शिबिर, रक्तदान शिबिर, अनाथमुलांसाठी शालेय साहित्याचे वाटप. स्वच्छता अभियान. बेटी बचाव बेटी पढाव इ. उपक्रम तसेच कोव्हीड योद्धाचा सत्कार हि आयोजित केला होता. मिया वॉकी पार्क मध्ये संस्थेच्या माध्यमातून ५०० पेक्षा जास्त विविध प्रकारची झाडे लावली आहेत.तसेच आदर्श गाव आदर्श सरपंच यासाठी पाटोदा गावचे सरपंच मा.भास्कर पेरे पाटील यांचे व्याखान आयोजित केले होते. संस्थे मार्फत असे नेहमी उपक्रम राबविले जातात.

रोबोटिक विभाग (Mechatronics Lab) इलेक्ट्रॉनिक्स साहित्य निर्मिती, प्रात्यक्षिकातून विज्ञान संकल्पना सादर करणारी अद्यावत प्रयोगशाळा, त्रिमितीय प्रिंटींग अद्यावत संगणक कक्ष मधून विद्यार्थ्याची ज्ञान दिले जाते.

इंटरॅक्टिव्ह बोर्ड–– नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यम मध्ये सर्व शिक्षण यापुढे इंटरॅक्टिव्ह स्क्रीन द्वारे शिकवले जाईल या शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणामध्ये अमुल्यग्रह बदल घडून येत आहे. नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम यांनी आपल्या १० वी व १२ वी वैभवशाली निकालाची परंपरा कायम ठेवली, नव कृष्णा व्हॅलीने गुणवत्ता पूर्ण शिक्षणाचा आदर्श घालून दिलेला आहे.

CBSE बोर्डाने ठरवून दिलेल्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शाळा सतत राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून “एक भारत श्रेष्ठ भारत”,”राष्ट्रीय जल सुरक्षा अभियान”,”राष्ट्रीय वाचन सप्ताह”,”स्वच्छ भारत अभियान” यासारखे सामाजिक उपक्रम मुलांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी नेहमीच शाळेचा कल असतो. इंग्रजी माध्यम शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ‘भाषिक विकास’व ‘बहुअंगिक विकास’करण्याकडे शाळा विशेष लक्ष देत असते.

वैदिक मॅथ्स,ॲबॅकस,मल्टीस्कील,बागकाम,पाककला,सेवा उपक्रम यामधून विद्यार्थी सहभाग घेतात. नव कृष्णा व्हॅली मध्ये विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासाला चालना देण्यासाठी “खेलो इंडिया” केंद्र चालवले जाते,या उपक्रमांअतंर्गत दरवर्षी ३० मुलांना SAI मान्यताप्राप्त Athletic प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण दिले जाते.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठीच नवकृष्णा व्हॅली स्कूल नेहमीच अग्रभागी असते.विविध खेळांसाठी व्यावसायीक व कुशल प्रशिक्षण शाळेमध्ये सातत्याने दिले जाते.शाळेतील शिक्षकांना अद्ययावत तंत्र शिक्षणाच्या व प्रशिक्षणाची जोड देवून गुणवत्तापूर्ण व नाविण्यपूर्ण शिक्षण देण्यास नवकृष्णा व्हॅली स्कूल कटिबध्द आहे.

सुरज स्पोर्ट्स अकॅडमी ची स्थापना १३ डिसेंबर १९९६ रोजी झाली असून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. प्रविण लुंकड हे आहेत. आतापर्यंत नऊ आंतरराष्ट्रीय खेळाडू व अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय खेळाडू घडले आहेत नव कृष्णा व्हॅली स्कूल ची माजी विद्यार्थिनी सध्या स्मृती मानधना ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये आपली कामगिरी उंचावत आहे.

नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवनीत पनीकर याची 4 बाय 100 मिटर रिले या प्रकारात चंद्रपूर येथे शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच नव कृष्णा व्हॅली स्कूल जुनियर कॉलेज उत्तुरची विद्यार्थिनी कुमारी शिफा झैरुद्दिन देसाई अकरावी बारावी सायन्स (सन 2019- 20) इस्रो मध्ये रिसर्च फेलो म्हणून इंटरशिप साठी निवड झाली आहे.

सुरज स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत दररोज सकाळी सहा ते साडेआठ व सायंकाळी चार ते सहा या वेळेत विविध खेळ प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक खेळ प्रकार अॅथलेटिक्स स्विमिंग आर्चरी मल्लखांब बॅडमिंटन वेटलिफ्टिंग सांघिक खेळ प्रकारांमध्ये क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल नेटबॉल व्हॉलीबॉल अशा प्रकारचा समावेश आहे जे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय शालेय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करतात त्यांच्यासाठी स्कूल फी मध्ये विशेष सवलत देण्यात येणार आहे वरील सर्व खेळ प्रकारासाठी स्वतंत्र व तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सुरज स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत अनेक जिल्हास्तरीय विभागीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते सुरज स्पोर्ट्स अकॅडमी कडे अध्यावत ४०० मीटर चा सिंडर ट्रॅक रिमिक्स बास्केटबॉल कोर्ट विथ लाईट त्याचबरोबर फुटबॉलचे ग्रास असलेले ग्राउंड हँडबॉल ग्राउंड क्रिकेट साठी अध्यावत विकेट त्याचबरोबर स्विमिंग साठी मिनी ओलंपिक साइज स्विमिंग पूल राष्ट्रीय पद्धतीचा बॅडमिंटन हॉल वेटलिफ्टिंग व जिम तसेच नेटबॉल व व्हॉलीबॉल चे स्वतंत्र ग्राउंड संस्थेकडे उपलब्ध आहे खेळामध्ये करिअर करण्याचे दृष्टिकोनातून सुरज स्पोर्ट्स अकॅडमी नेहमी प्रयत्नशील असते त्यासाठी इन्चार्ज विनायक जोशी यांच्याशी संपर्क साधा तसेच भारतीय खेळ प्राधिकरण अथलेटिक्स खेळ प्रकारचे सेंटर आहे प्रति वर्षी मे महिन्यात ९ ते १५ वयोगटातील मुलामुलींची निवड चाचणी घेण्यात येते.

नव कृष्णा व्हॅली मेडिकल आणि आयआयटी अॅकडमी ही एक उत्कृष्ट कोचिंग संस्था आहे. हे IIT JEE Main, JEE Advanced इत्यादी अभियांत्रिकी तसेच AIIMS आणि NEET, AIPMT, इत्यादी वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देते. विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना प्रत्यक्षात आकार देण्यासाठी आणि यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी अतिशय अनुकूल आणि बौद्धिकदृष्ट्या उत्तेजक स्पर्धात्मक वातावरण प्रदान करून अध्यापनाला पूरक आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत. आपल्या स्वप्नातील करिअरची तयारी करण्यासाठी योग्य संस्था निवडणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे . दिवसेंदिवस स्पर्धा तीव्र होत असल्याने योग्य मार्गदर्शन आणि केंद्रित प्रशिक्षण नितांत आवश्यक झाले आहे.

नव कृष्णा व्हॅली मेडिकल आणि आयआयटी अकादमी ‘येथे, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शनासह जागतिक दर्जाचे शिक्षण येतो. आमच्या अनोख्या अध्यापनशास्त्रामुळे, विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यात मदत करते करतात; IITJEE, BITSAT, NEET, AIIMS, JIPMER राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षाना मदत करतो. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, अद्यावत लायब्ररी, IITians चा सर्वोत्कृष्ट पूल आणि विद्याशाखा सदस्य म्हणून डॉक्टरेट, दर्जेदार अभ्यास साहित्य आणि उत्कृष्ट चाचणी पद्धती यामुळे आम्हाला पालक आणि विद्यार्थ्यांची पसंती मिळते.

नव कृष्णा व्हॅली मेडिकल आणि आयआयटी अॅकडमी फौंडेशन कोर्स” विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास-केंद्रित दृष्टिकोन विकसित करण्याच्या दिशेने पाऊल…..

८ वी, ९वी आणि १० वी चा फौंडेशन कोर्स हा एक उत्तम प्रकारे तयार केलेला अभ्यासक्रम आहे जो विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांचा वास्तविक अनुभव मिळविण्यात मदत करू शकतो. प्रवेश परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांवर येणारा दबाव कमी करण्यासाठी हा तीन टप्प्यांचा उपक्रम आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या मनाला आकार देणारा आणि सर्जनशील व वैज्ञानिक विचारसरणी विकसित करणाऱ्या शिक्षणाच्या विविध पद्धती प्रदान करतो. उत्कृष्ट प्रशिक्षण, सराव आणि वेळेवर चाचणी मालिका विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टीची वैचारिक स्पष्टता प्राप्त करण्यास मदत होते.

एनक्रिश web-tech प्रायव्हेट लिमिटेड सांगली या ग्रामीण भागातील बीपीओ सेंटरची सुरुवात जुलै २०१७ पासून महिला उद्योजिका मृगनयना प्रवीण लुंकड यांच्या मार्गदर्शनाखाली या कॉल सेंटरची सुरुवात झाली सांगली कोल्हापूर बेळगाव जिल्ह्यातील युवक-युवतींना “कमवा व शिका” या धर्तीवर सेंटरमध्ये काम करण्याची संधी मिळते. यापूर्वी सेंटरचे काम करण्यासाठी युवक-युवतींना मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद यासारख्या मेट्रो सिटी मध्ये जावे लागत होते मात्र ग्रामीण भागातील या सेंटरमुळे युवक-युवतींना त्यांच्या भागातच काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे आतापर्यंत कॉल सेंटरमधून शंभरहून अधिक युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे.

यासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री. प्रविणशेठ लुंकड, संस्थेचे सचिव मा. श्री.एन.जी.कामत, चेअरमन मा.श्री.यशवंत तोरो. मराठी माध्यम चे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका व डायरेक्टर मा.सौ.संगिता पागनिस, नव कृष्णा व्हॅली मेडिकल आणि आय.आय.टी. अॅकडमी मा. अश्विनी माने , नव कृष्णा व्हॅली, अड्मीन ऑफीसर मा. श्री. रघुनाथ सातपुते, सुरज स्पोर्टस् अॅकदमीचे सचिव मा.श्री. विनायक जोशी तसेच अकाउंट विभागाचे प्रमुख मा. श्री.श्रीशैल मोटगी,होस्टेल प्रमुख श्री.प्रदीप पाटील, आय. टी.डिपार्टमेंट प्रमुख मा. श्री.राजेंद्र पाचोरे, संचालक श्री. अनिरूद्ध बनसोड संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविले जातात.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: