Thursday, May 2, 2024
Homeखेळनव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश...

नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जलतरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सावली सोशल सर्कल यांच्या सौजन्याने वीर सावरकर चषक( 8जुलै 2023) स्विमिंग कॉम्पिटिशन कोल्हापूर भोगावती या जलतरण तलाव येथे संपन्न झाल्या. त्या स्पर्धेमध्ये नव कृष्णा व्हॅली इंग्लिश मेडियम कुपवाड एमआयडीसी या स्कुलची प्राविण्य प्राप्त खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे:

हर्षित कुंभार – 50मीटर बॅकस्ट्रोक – रजत पदक, 50 मीटर बटरफ्लाय – रजत पदक, 100 मीटर बॅकस्ट्रोक- कास्य पदक, 100 मीटर फ्री स्टाइल -कास्य पदक

तेजस्विनी कुंभार – 50 मीटर ब्रेसस्ट्रोक-रजत पदक, 50 मीटर बटरफ्लाय- रजत पदक, 50 मीटर फ्री स्टाइल – कांस्य पदक

आयुष कोटे – 50 मीटर फ्री स्टाइल – रजत पदक, 50मीटर ब्रेसस्ट्रोक-रजत पदक

श्रेयश किनीकर – 50 मीटर बटरफ्लाय – कांस्य पदक, अदिती कुरणे – सहभाग

राजवर्धन मोरे – सहभाग या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेचे नाव उंचावले.

यावेळी नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुपवाड एमआयडीसी मार्फत संस्थेच्या संचालिका व प्राचार्य मा.संगीता पागनीस यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जलतरण प्रशिक्षक नामदेव नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी संस्थेचे संस्थापक मा प्रवीणजी लुंकड सचिव एन जी कामत व इंग्रजी माध्यमाचे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण सर स्पोर्ट्स इनचार्ज विनायक जोशी तसेच सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: