Saturday, May 4, 2024
Homeराज्यसुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली अँड ज्युनिअर कॉलेज येथे सुरज...

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली अँड ज्युनिअर कॉलेज येथे सुरज आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग ओपन चेस टूर्नामेंट स्पर्धेत सुरुवात…

Share

सांगली – ज्योती मोरे

सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व नूतन बुद्धिबळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 24 व 25 डिसेंबर 2022 रोजी सुरज आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग ओपन चेस टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन केले आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर शरद बनसोडे क्रीडा संचालक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बुद्धिबळाची चाल खेळून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्राध्यापक डॉक्टर आकाश बनसोडे बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीशजी चितळे उपाध्यक्ष महाराष्ट्र चेस असोसिएशन तसेच अध्यक्ष नूतन बुद्धिबळ मंडळ त्याचबरोबर मा चिंतामणी लिमये सचिव नूतन बुद्धिबळ मंडळ श्री विनायक जोशी इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी तसेच प्राध्यापक जहांगीर तांबोळी सचिव सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन श्रीशैल मोडगी राजेंद्र पाचोरे तसेच मा.रामकृष्ण मगदूम प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल उत्तुर हे उपस्थित होते.

सुरुवातीला मा चिंतामणी लिमये यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व बुद्धिबळ विषयी माहिती सांगताना ही 19 वर्षाची परंपरा मा. प्रवीणजी लुंकड यांनी जोपासले आहे ही स्पर्धा त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आयोजित करीत असतात कै .भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या नंतरही या स्पर्धा कार्यरत ठेवला याचा प्रामुख्याने चिंतामणी लिमये यांनी उल्लेख केला त्यानंतर पाहुण्यांची ओळख श्री विनायक जोशी यांनी करून दिली.

त्यानंतर डॉक्टर आकाश बनसोडे त्यांनी स्पर्धकांना स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर जहांगीर तांबोळी यांनी सुद्धा बुद्धिबळाचे महत्त्व सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर शरद बनसोडे क्रीडा संचालक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी मी आतापर्यंत आऊटडोअर स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे.

परंतु मला भेट दिलेल्या बुद्धिबळ संच याचा उपयोग मी निश्चित पुढील स्पर्धेत सहभागी होईन असा उल्लेख केला विद्यार्थ्यांनी कोणताही खेळ असू दे त्यामध्ये त्यांनी सातत्यने सराव करावा यश निश्चित मिळणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवाजी विद्यापीठ अंतर्गत खेळाडूंना चांगले प्रकारचा भत्ता चांगला आहार स्पर्धेसाठी जाण्या-येण्याचा रेल्वे व वेळप्रसंगी विमानाचा प्रवास तसेच ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी मध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंना विशेष बक्षीस योजना आहेत.

Rapid Rating Open Chess Tournament

मा गिरीशजी चितळे यांनी खेळ वाढविण्यासाठी मदत करू असे सांगत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धेमध्ये 200 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून भारतामधून विविध ठिकाणाहून हे खेळाडू स्पर्धेसाठी आलेले आहेत त्यांची निवास व जेवण व्यवस्था नव कृष्णा व्हॅली स्कूल वसतिगृह येथे करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा ह्या 24 व 25 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार असून एकूण दोन लाख रुपये ची पारितोषिक आहेत त्यासाठी माननीय प्रवीण सर नेहमीच अग्रेसर असतात या खेळातून चांगले खेळाडू घडावेत याच उद्देशाने या खेळाचे आयोजन करण्यात येत असते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: