Wednesday, February 21, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची चंद्रपुर येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्रजी जैन...

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची चंद्रपुर येथे राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या उपस्थितित जिल्हा आढावा बैठक संपन्न…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

जानेवारीला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी व बूथ आढावा बैठक महेश भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी आगामी काळात चंद्रपूर जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करणे व पक्षाचा विस्तार करुन बूथनिहाय बांधणी करणे यासंदर्भात चर्चा करून जिल्हयातील आढावा घेण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वसामान्य जनतेच्या व विकासाच्या मुद्द्यावर कार्य करीत आहे. राज्याचे उमुख्यमंत्री मंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुलभाई पटेल व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे आपण सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांना जबाबदारी देऊन लवकरात लवकर प्रत्येक बूथ वर कमिट्या तयार कराव्यात. यात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. पक्ष संघटन मजबूत असेल तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल याची ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली. पक्षाची वाढ व विस्तार करण्यासाठी माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते जिल्हयातील युवक, विद्यार्थी, महिला, ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभागाच्या काही तालुकानिहाय नियुक्ती पत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले असुन आबिद अली, रंजना पारशिवे, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, विनोद नवघडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रीय सचिव व माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, गोंदिया रायुकाँ जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, प्रदेश सचिव आबिद अली, नगरसेवक महेंद्रसिंग चंदेल, महिला जिल्हाध्यक्ष रंजना पारशिवे, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, जेष्ठ नेते मनोहर काच्छेला, महिला जिल्हा कार्याध्यक्ष अर्चना बुटले, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, ओबीसी सेलचे

जिल्हाध्यक्ष अविनाश राऊत, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष प्रशांत झांबरे, वैद्यकीय मदत जिल्हाध्यक्ष पंकज ढेंगारे, महिला शहर अध्यक्षा चारुशीला बारसागडे, हेमांगीनी विश्वास, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राज्य संघटक अमोल बावणे, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, माजी उपसभापती हर्षवर्धन पिपरे,

अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष नौशाद शेख, चंद्रपूर तालुकाध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, बल्लारपूर तालुकाध्यक्ष महादेव देवतळे, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष दरेकर, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, सिंदेवाही तालुकाध्यक्ष दामोदर ननावार,

ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष नोगेश बगमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, चिमूर तालुकाध्यक्ष योगेश ठूने, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, कोरपणा तालुका अध्यक्ष धनराज जिवणे, कार्याध्यक्ष तनवीर शेख, कुतुब सिटी, आकाश येसनकर, गीतेश सातपुते, चंद्रकांत कुंभरे, रवी डीकोंडा, सलीम पठाण, जहीर खान, नासिर शेख, प्रशांत घुमे, ओमकार गेडाम, अश्विन उपासे, ऍड मंगेश काळे उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: