Monday, February 26, 2024
Homeराजकीयएकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राजेश कटरे यांच्या...

एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक राजेश कटरे यांच्या उपस्थितित संपन्न…

Share

एकोडी जनसंपर्क कार्यालयात बैठक संपन्न…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया तालुक्या अंतर्गत येत असलेल्या एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक जनसंपर्क कार्यालय एकोडी स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे राजेश कटरे यांच्या अध्यक्षता खाली संपन्न झाली. खासदार प्रफुलभाई पटेल व माजी आमदार व जिल्हा नियोजन समिति सदस्य राजेंद्रजी जैन यांच्या माध्यमातून गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या विकासाला एक मोठी चालना मिळालेली आहे.

असे उपस्थितांनी सांगितले तसेच खासदार प्रफुलभाई पटेल यांनी शेतकऱ्यांच्या धानाला हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळवून देण्याचे काम केले आहे. यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कार्याची व शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हिताकरिता केलेल्या कार्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने तळागाळातील घटकापर्यंत पोहचून पक्ष बांधणी करावी प्रत्येक बूथ वर युवक, महिला व जेष्ठ नागरिक यांचा समावेश करावा अश्या सूचना मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना केल्यात.

बैठकीला सरपंच द्वारका साठवने, ग्राम पंचायत सदस्य पुरुषोत्तम भदाडे, माजी सरपंच रविकुमार पटले, माजी सरपंच हितेश फताये, ग्राम पंचायत सदस्य दिपक रिणायत, आरिफ़ पठान, लंकेश पटले, धर्मेन्द्र कनोजे, प्रशांत मिश्रा, रंजित टेंभरे, भरत परिहार, गोविन्द लिचडे, महेंद्र कनोजे, मोनू पठान, पिरम बरियेकर, पुरनलाल बिसेन , राजेशकुमार तायवाडे पत्रकार मिडिया प्रमुख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र व क्षेत्रातील कार्यकर्ता मोठ्या संख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रंजित टेंभरे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोनु पठान यांनी केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: