Monday, May 27, 2024
Homeराज्यनरखेड | हरवलेल्या मुलाचा विहिरीत सापडला मृतदेह...

नरखेड | हरवलेल्या मुलाचा विहिरीत सापडला मृतदेह…

बुधवारी सायंकाळी 5 वाजता पासून होता हरवला. गुरवारी सकाळी 9 च्या सुमारास गावालगतच्या शेतातील विहिरीत सापडला मृतदेह.- दिव्यांशू देवेंद्र भिल्लम असे मृत मुलाचे नाव.- घातपात झाल्याची शक्यता.- जलालखेडा पोलिस करत आहे तपास.- रात्रीपासून पोलिस व डॉग स्कॉट होते मुलाच्या शोधात…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड तालुक्यातील सिंजर येथे एक दुर्दैवी घटना घडली असून हरवलेल्या मुलाचा मृतदेह गावालगतच्या विहिरीत सापडला आहे. दिव्यांशू देवेंद्र भिल्लम वय वर्ष 3 वर्ष 6 महीने रा. सिंजर हा मुलगा बुधवारी सायंकाळी 5 वाजता पासून हरवला होता. गुरवारी सकाळी 9 च्या सुमारास त्या मुलाचा मृतदेह गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आला.

देवेंद्र वामनराव भिल्लम वय 37 वर्ष रा. सिंजर यांचा चुलत भाऊ कैलास भिल्लम यांच्याकडे कार्यक्रम सुरू होता. दिव्यांशु रडत रडत आपल्या बहिणींच्या मागे कार्यक्रमाला जाण्यात सायंकाळी 5 च्या सुमारास जात होता. मुलाचे वडील सायंकाळी 6 शेतातून घरी परत आले असता आईला मुलांविषयी विचारले असता मुलगा कार्यक्रमात गेला असल्याचे आईने सांगितले.

मुलाचे वडील मुलाला पाहायला चुलत भाऊ कैलास भिल्लंम यांच्याकडे गेले असता मुलगा दिव्यांशू भिल्लम तिथे मिळाला नाही. मुलाचा आजूबाजूला, शेतशिवारात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता, मिळून आला नाही. लगेच मुलाच्या वडिलांनी जलालखेडा पोलिस स्टेशन गाठले व मुलगा हरवला असल्याची तक्रार नोंदवली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 363 भादवी नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी जावून मुलाचा शोध घ्यायला सुरवात केली.

पण मुलगा मिळाला नाही. लगेच पोलिसांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली असता घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी काटोल बापू रोहम, नरखेड येथील ठाणेदार कृष्णा तिवारी, पोलिस उपनिरीक्षक मनोज शेंडे, पोलिस कर्मचारी, डॉग स्कॉड व नागपूर येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मुलाचा शोध घ्यायला सुरवात केली परंतु रातभर मुलाचा शोध लागला नाही.

मुलाच्या अंगात लाल कलरची काळी पट्टी असलेले टी-शर्ट, काळ्या कलरची हाफ पॅन्ट घालून होता. गुरवारी सकाळी शेतकरी आपल्या शेतात गेला असता त्याला विहिरीत मुलाचा मृतदेह दिसून आला त्याने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली तसेच लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलाचा मृतदेह विहरी बाहेर काढला व उत्तरीय तपासणी साठी शव विच्छेदन गृहात पाठवलं. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास जलालखेडा पोलिस करत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments