Thursday, May 2, 2024
Homeराज्यदानापूर येथे श्री खंडोबा मंदिर येथे नंगर उत्सव साजरा...

दानापूर येथे श्री खंडोबा मंदिर येथे नंगर उत्सव साजरा…

Share

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथील मार्तंड जय मल्हार मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे पौष पौर्णिमेला याही वर्षी २४ व २५ जानेवारी ला नंगर उत्सव साजरा करण्यात आला. दिनांक २४ ला देवाची सकाळी जेवणारपाटी सायंकाळी ८ वाजता जागरण कार्यक्रम यामध्ये पंचक्रोशीतील १५वाघे मंडळ सहभागी झाले होते.

जय मल्हार वाघे मंडळ पाळोदी यांनी देवाचं लग्नसोहळा ब्रम्ह मुहूर्तावर पार पाडला .यानतंर नंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, यावर्षी नगंर तोडण्याचा मान पीयुष बोरसे या बालकाला मिळाला.

सकाळी १० वाजता देवाची व नगंराची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिक ठिकाणी महिलांनी पुजन केले .दुपारी १२ वाजता महाआरती नंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: