Tuesday, May 14, 2024
Homeराज्यनागपूर | संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

नागपूर | संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…

Share

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -हिंगणा -स्थानिक संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेद्वारे संचालित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व स्व: देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७६ वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी हिंगणा येथील अमर जवान शहीद स्व: ईश्वर सदाशिव नागपूरे यांच्या पत्नीचा व परिवाराचा श्री संत गमाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग रमेशचंद्रजी बंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यांच्या जीवनावरती नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते यांनी ‘अमर जवान’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

स्व: ईश्वर सदाशिव नागपूरे हे हिंगण्यात राहत होते. ते केंद्रीय राखीव पोलीस दलात होते. त्यांची ड्युटी काश्मीरला लागली असताना ते गस्त आटपून आपल्या कॅम्प कडे जात असताना एका आतांकवादयानी त्यांना गोळी मारली व तो आतंकवादी अंधाराचा फायदा घेवून त्यांनी पलायन केले.

अशा शाहिदांची मुलगी तेव्हा ६ महिन्याची होती व मुलगा अडीच वर्षाचा होता. अशा हिंगण्यातील एका तरुण सैनिकांने देशासाठी आपले प्रायाण निछावर केले. हिंगण्यातील व परिसरातील आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे. अशा वीर जवानांना सलाम.

आज या कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष महेशजी बंग व संस्थेच्या उपाध्यक्ष सौ.अरुणा बंग. नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, स्व:देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन तुपेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद महाले यांनी केले व आभार दिनकर लखमापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: