Thursday, May 2, 2024
Homeराज्यमूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचे घंटा आंदोलन…

मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर स्वाभिमानीचे घंटा आंदोलन…

Share

मूर्तिजापूर – विविध मागण्यासाठी शुक्रवार दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालया जवळ खालील मागण्यासाठी करणार घंटा नांदोलन.

१) एलोमोझॅकचा पंचनामा करून व त्याचे क्षेत्र वाढवुन शेतकरी हिताचा निर्णय आपण शासन दरबारी मांडावा.
२) २०२२ मध्ये झालेली अतिवृष्टी मध्ये व्हि. के. नंबर व २०२३ मध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये वंचित राहिलेले शेतकरी यांचा प्रश्न निकाली काढावा.
३) शेतकऱ्यांना नको असलेली ई-पिक पाहणी रद्द करण्यात यावी.

४) ज्या शेतकरी लाभार्थी यांनी २०२३ च्या जुलै व नोव्हेंबर मध्ये पिकविम्याची नुकसानीची तक्रार केली आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पिक विमा कंपनीला आपण आदेश काढुन शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ मदत जमा करण्यात यावी.
५) पावसाचा खंड पडल्यामुळे पिक विमा कंपनी कडून जी देय अग्रिम २५% रक्कम मिळाली नाही. त्यामध्ये राहलेले
तालुक्यातील वंचीत शेतकरी यांना तात्काळ अग्रिम रक्कम व उर्वरित ७५% विमा रक्कम थेट खात्यामध्ये जमा करावी.

६) बँकांच्या सक्त वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी.
७) २०२३ ऑक्टोंबर-नोव्हेंबर मध्ये झालेली अतिवृष्टी यामध्ये प्रामख्याने तुर, हरभरा, कापुस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे बाधित क्षेत्रफळ जास्तीत जास्त टाकुन व व्हि. के. नंबर तात्काळ देऊन आचारसंहितेपुर्वी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी किंवा आपल्या स्तरावर शेतकरी वंचित राहु नये याकरिता निपटारा कॅम्प चे आयोजन करावे.
७) दुष्काळ सदृष्य परिस्थिती असल्यामुळे तालुक्यामध्ये जे विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या बस मध्ये रोज प्रवास करतात त्यांना आपल्या स्तरावर मोफत पास देण्यात यावी.

ह्या मागण्यासाठी एक दिवसीय घंटा नाद आंदोलनात दिनांक २३/०२/२०२४ रोजी ११वा. तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांनी व युवक शेतकरी पुत्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुर्तिजापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: