Thursday, May 2, 2024
Homeराज्यमुर्तिजापूर | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश"...

मुर्तिजापूर | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान राबविण्याबाबत…

Share

मुर्तिजापूर : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून त्याअंतर्गत दिनांक ०९ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आज अमलबजावणी व नियोजन करण्या करिता नगर परिषद मुर्तिजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

सदर उपक्रमांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलीदान दिले आहे अश्या थोर व्यक्तींच्या नावानची शिलाफलक तयार करून त्याची उभारणी करणे, वसुधा वंदन उपक्रमांतर्गत विविध देशी प्रजातीच्या ७५ रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करणे, स्वातंत्र्य सैनिक व विराना वंदन उपक्रमांतर्गत संरक्षण दल,पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी/माजी सैनिकांचां स्थानिक पारंपारिक पद्धतीने यथोचीत सन्मान करणे, लोक्रतिनिधींनी, सर्व अधिकारी कर्मचारी, शासकीय कार्यालये व शहरवासियानी हातात मातीचे दिवे घेऊन पंचप्राण शपथ घेणे, ध्वजारोहन कार्यक्रम घेणे इत्यादी उपक्रम राबवायचे असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुप्रिया टवलारे यांनी सांगितले तसेच मागील वर्षीप्रमाणे दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवयाचा असून प्रत्येक घरोघरी राष्ट्रिय ध्वज फडकविने बाबत त्यांनी जनतेला आवाहन केले.

मुख्य म्हणजे दिनांक १६ ते २० ऑगस्ट २०२३ या दरम्यान नगर परिषद हद्दीतील प्रभागनिहाय एक दोन मूठ माती घेऊन त्यातून शहराचा कलश तयार करून तो जिल्हास्तरावर जमा करून जमा झालेल्या सर्व कलशामधून थोडी माती घेऊन प्रत्येक जिल्ह्याचा एक कलश तयार करून पुढे तो कलश मा. पंतप्रधान महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली . सदर अभियान मध्ये स्थानिक लोक्रतिनिधींनी , युवक मंडळ, महिला बचत गट, सर्व नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. नियोजन सभेकरिता सर्व पत्रकार बंधू, व्यापारी असोसिएशन चे अशोक भावनाणी, आनंद बांगड, सतीश शर्मा , चंदन अग्रवाल, मेडीकल असोशिएशन चे नवनीर्वाचित अध्यक्ष डागाजी, सोमानिजी व इतर पदाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजेश भुगुल सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: