Monday, February 26, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | नमो चषक स्पर्धेचे ढिसाळ नियोजन...प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने १५ गंभीर जखमी...आयोजकावर...

मूर्तिजापूर | नमो चषक स्पर्धेचे ढिसाळ नियोजन…प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने १५ गंभीर जखमी…आयोजकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी….

Share

मूर्तिजापूर : जश जशी निवडणूक जवळ येत आहे ते तस तसे राजकीय पक्षाचा कार्यक्रमांना उत येत आहे. मात्र कधी कधी आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांच्या जीवावर बेतले जाते. काल मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघात दगडपारवा येथे नमो चषक नावाने भाजप द्वारे शासकीय क्रीडा संकुल मध्ये जीवघेण्या नियोजन मुळे अनेक नागरिक गंभीर जख्मी झाले असून आयोजकांवर गुन्हे दाखल करून नागरिकाच्या उपचाराचा खर्च भाजप कडून वसूल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

नमो चषकाचे नावे संपूर्ण राज्यात २८८ मतदार संघात भाजपने क्रीडा विभागाचा गैरवापर करीत राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार करायला क्रिडा संकुल मध्ये स्पर्धा आयोजित केल्या आहेत.ह्याच आयोजन अंतर्गत दगडपारवा येथे आमदार हरीश पिंपळे ह्यांचे हस्ते नमो चषक स्पर्धा सुरू झाली होती. ह्या साठी दगडपारवा येथे धोकादायक पद्धतीची प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती. सदर गॅलरी कोसळून १५ नागरिक गंभीर जखमी झाले असून ५० पेक्षा अधिक नागरिकांना दुखापत झाली आहे.

ह्या गचाळ आयोजन मुळे नागरिकांना नाहक जायबंदी व्हावे लागले असून ह्या प्रकरणी आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि जखमीच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई भाजप कडून वसूल करण्यात यावी.तसेच इतर राजकीय पक्षाचे कार्यक्रम करायला अडवणूक करणारे आणि भाजप साठी शासकिय मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देणारे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट ह्यांची चौकशी करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: