Saturday, May 4, 2024
Homeगुन्हेगारीमूर्तिजापूर | रविकुमार राठी या समाजकंटकावर गुन्हे दाखल करा...बौद्ध समाज बांधवांच्या तर्फे...

मूर्तिजापूर | रविकुमार राठी या समाजकंटकावर गुन्हे दाखल करा…बौद्ध समाज बांधवांच्या तर्फे निवेदन…

Share

मूर्तिजापूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयांची विटंबना केली व जाणुनबुजन महापुरषाचा अपमान केला. याबद्दल जातीवादी समाजकंटक रविकुमार रमेशचंद्र राठी यांचेवर २९५, २२१ अंतर्गत सामाजिक समजाच्या भावना दुखावल्या बद्दल गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची सर्व बौध्द समजाच्या वतीने मागणीसाठी काल दि.7 डिसेंबर 2023 रोजी मुर्तीजापुर तालुका तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व ठाणेदार साहेब,पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहर यांना निवेदन देण्यात आले आहे.

दि.२८/११/२०२३ रोजी अंदाजे १२ वाजता अशोक वाटीका अकोला येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हयांना हेतुपुरस्सर दोन समाजामध्ये तेढ निर्माण व्हाय, जातीय दंगल व्हावी हया कारणाने एक समाजकंटक नामे रविकुमार रमेशचंद्र राठी हा पाया मध्ये बुट घालुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्याला हार घालत होता. त्यावेळेस अशोक वाटीकेतील लोकांनी त्यांना हटकले असता गैरअर्जदाराने तेथील नागरीकांसोबत अरेरावीची भाषा बोलुन त्यांना तेथुन हुसकावुन लावले. सदर व्यक्ती हा मूर्तिजापूर तालुक्यातील रहिवाशी असल्याचे आम्हाला समजले आहे.

वरील गैरअर्जदाराने आम्ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळयाला बुट घालून हार अर्पण संपूर्ण बौध्द समाजाच्या धार्मिक भावना दुखाविलेल्या आहेत त्यामुळे समाजामध्ये गैरअर्जदारा विरुध्द असंतोषाचे भावना निर्माण झाल्या आहेत. वरील गैरअर्जदाराने केलेले कृत्य अतिशय गंभीर स्वरुपाचे असून त्यामुळे संपुर्ण बौध्द समाजाच्या मनाला वरील कृत्यामुळे ठेच पोहचली आहे. गैरअर्जदार समाजकंटक हा जातीवादी असून त्याने जे केले आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरीता आहे. तसेच संबंधीत कृत्यामुळे जातीय दंगलची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वरील गैरअर्जदाराने त्याचे बुटासहीत महामानव डॉ. बाबासाहेब यांना हार अर्पण करण्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केलेला आहे. त्यामुळे वरील गैरअर्जदारावर योग्य ती कारवाई करुन त्याच्यावर भा.द.वि. २९५. तसेच आय.टी. नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे ही विनंती.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: