Homeराज्यमा.सुगत वाघमारे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मुर्तिजापूर येथे सत्कार...

मा.सुगत वाघमारे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मुर्तिजापूर येथे सत्कार…

Share

मूर्तीजापुर – तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी चे संचालक व अध्यक्ष, सुप्रसिद्ध उद्योजक,उद्योगरत्न व सामाजिक कार्यकर्ते मा.सुगतजी वाघमारे यांना सामाजिक क्षेत्रात असामान्य काम केल्याबद्दल सर्वोच्च संस्थांमध्ये तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी च्या माध्यमातून राजभवन मुंबई येथे मा. राज्यपाल श्री रमेश बैस ,मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते सी एस आर हिरो हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

त्यानिमित्ताने कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुर्तिजापूर, नेहरू युवा मंडळ मुर्तिजापूर कडून तिक्ष्णगत कार्यालय मुर्तिजापूर येथे मा. सुगत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कवी,युवा कार्यकर्ते अनिल डाहेलकर, गझलकार पत्रकार मिलिंद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते बंडू मोंडोकार, श्रीकांत पिंजरकर ,विशाल शिंदे , प्रशांत कडू,क्रिष्णा घ्यारे, सुरेश जळे, अख्तर हुसैन, आदीसह कलाविष्कार व नेहरू युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: