Thursday, May 2, 2024
Homeराजकीयखासदार संजयकाका पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (ड्राय पोर्ट)...

खासदार संजयकाका पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (ड्राय पोर्ट) सलगरे ता.मिरज येथे साकार होणार…

Share

सांगली – ज्योती मोरे.

कवलापूर ता.मिरज येथील विमानतळासाठी उद्योग खात्याची जमीन हस्तांतरण प्रक्रिया काल गतिमान झाली आणि आज सलगरे ता. मिरज येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कसाठी ( ड्रायपोर्ट) उद्योग खात्याकडे जागा हस्तांतरणासाठी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, सांगलीचे लोकप्रिय खासदार संजयकाका पाटील आणि मंत्रालयीन सचिव व वरिष्ठ अधिकारी तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे लवकरच सलगरे ता मिरज येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क जो खासदार संजयकाका पाटील यांचा शेतकऱ्यांसाठी असणारा ड्रीम प्रोजेक्ट साकार होण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हे एक सुवर्णपानच ठरणार आहे. याबाबतची अधिकची माहिती खासदार संजय काका पाटील यांनी मुंबईहून बैठकीनंतर पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलगरे येथे ता.मिरज जि. सांगली प्रस्तावित पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवेला लागून 350 एकर एवढी सरकारी जमीन असून सलगरे ता.मिरज येथे मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLP) ड्रायपोर्ट उभारणी करावा अशी मागणी करण्यात आली होती.

सदर मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्ट उभारल्यास शेतकऱ्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते तसेच वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्यामुळे चांगल्या दर्जाचा व वेळेत शेतकरी माल बाजारपेठेत जाऊ शकतो सलगरे ता. मिरज येथील हा ड्रायपोर्ट प्रस्तावित ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे आणि लागून मिरज-पंढरपूर रेल्वे मार्गापासून जवळ आहे.

त्यामुळेच केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात माझ्या आग्रही मागणीवरून मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क (ड्रायपोर्ट) मंजूर केले आहे तसेच नामदार गडकरी यांनी सांगली जिल्ह्यातून जाणारा पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड द्रुतगती मार्ग मंजूर केला ग्रीन फील्ड हायवे लगत ड्रायपोर्ट झाल्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढवून बाजारपेठेला चालना मिळणार आहे.

नामदार गडकरी यांनी दोन मोठी विकासाची कामे मंजूर केल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव आणि कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विकासाला चालना मिळणार आहे. सलगरे ता. मिरज येथील मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कच्या (ड्रायपोर्ट) विकासासाठी केंद्रातील सर्व पूर्तता पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरावरून कार्यवाही करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला आवश्यक ते निर्देश द्यावेत म्हणून राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे काही दिवसांपूर्वी मागणी करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज सदर लॉजिस्टिक पार्क (ड्रायपोर्ट) होण्यासाठी सर्वात मोठे पाऊल उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी टाकले असून याबाबत बैठकीत जमीन हस्तांतरणाचा मोठा निर्णय झाला असल्याची माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली. सदरचा मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क झाल्यामुळे काहीजणांना हा ड्रायपोर्ट म्हणजे एक स्वप्न वाटत होते ते स्वप्न शेतकऱ्यांच्यासाठी सत्यात उतरत असल्यामुळे मला माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाची परतफेड करण्यासाठी मी एक निमित्त झालो असल्याची सदभावना खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केली तसेच सलगरे ता.मिरज येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक (ड्रायपोर्ट) पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही खासदार पाटील यांनी शेवटी दिली.

मंत्रालयात उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या ‘मुक्तागिरी’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीला माझ्यासह उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी MIDC बिपीन शर्मा,डेप्युटी CEO MIDC शिवाजी पाटील, महसूल उपसचिव श्रीराम यादव, सांगली जिल्हाधिकारी राजा दयानिधी, कोल्हापूर एमआयडीसी RO, सांगली MIDC च्या बिरजे मॅडम व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: