Friday, May 17, 2024
Homeराज्यमोदी@9 टिफिन पार्टी...

मोदी@9 टिफिन पार्टी…

Share

नरखेड – अतुल दंडारे

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेनुसार भाजप नेत्यांनी आपआपल्या क्षेत्रात कार्यकर्त्यांसोबत टिफीन पार्टीचे आयोजन करून ९ वर्षातील सरकारच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचावी त्या अनुषंगाने काटोल नरखेड विधान सभेचे विकास पुरुष मा. चरणसिंगजी ठाकूर यांनी पारडसिंगा येथे टिफीन पार्टीचे आयोजन केले.

कार्यकर्त्यानी आपआपल्या शिदोरी आणून सामूहिक जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतला.यावेळी कार्यकर्त्यांना चरनसिंगजी ठाकूर, जिल्हा महामंत्री दिनेश ठाकरे, नरखेड तालुका माजी अध्यक्ष श्यामराव बारई, कटोलचे अध्यक्ष विजयजी महाजन,रविजी येनुरकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रामुख्याने काटोल संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र सरोदे,

नरखेड संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष दिलेश ठाकरे,नरखेड शहराचे महामंत्री मनिष दुर्गे,राजेश क्षीरसागर,सरपंचा सौ.काळेताई,रुपेश तातोडे,अक्षय ईरखेडे,मयूर दंढारे,यांचेसह काटोल-नरखेड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: