Monday, May 6, 2024
HomeBreaking Newsसमृद्धीचा टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला…अमित ठाकरे यावर काय म्हणाले?…

समृद्धीचा टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला…अमित ठाकरे यावर काय म्हणाले?…

Share

नाशिकमध्ये शनिवारी रात्री उशिरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी टोल प्लाझाची तोडफोड केली. कारण होते मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर थांबवल असल्याने कार्यकर्त्यांना एवढा राग आला की त्यांनी टोल प्लाझा तोडफोड केला आणि तिथे उपस्थित ऑपरेटर्सना माफी मागायला लावली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे हे शनिवारी रात्री ९.१५ च्या सुमारास सिन्नर येथील गोंदे टोल प्लाझा येथे थांबले होते. ते त्यांच्या कारने नाशिकहून मुंबईला जात होते. त्याच्या फास्टॅगशी संबंधित काही माहिती टोलमध्ये चुकीच्या पद्धतीने जुळली होती. यानंतर पहाटे अडीच वाजता मनसे कार्यकर्त्यांच्या जमावाने या टोलनाक्यावर जाऊन तोडफोड केली. यानंतर तेथील ऑपरेटर्सनी माफीही मागितली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वावी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही तपासून पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी सांगितले की, त्यांना अद्याप टोल प्लाझा कर्मचार्‍यांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, परंतु गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यावर आता अमित ठाकरे प्रतिक्रिया देत म्हणाले. “टोलनाक्यावरच्या कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा होती. फास्टटॅग असूनही गाडी बराचवेळ थांबवली. टोलनाक्याची टेक्निकल अडचण होती. मॅनेजरसह कर्मचाऱ्याची भाषा उद्धटपणाची होती” असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मला नाशिकला पोहचल्यावर कळलं, की टोलनाका फोडला. राज ठाकरेंमुळे अनेक टोलनाके बंद झाले. माझ्यामुळे आणखी एक वाढला” असं अमित ठाकरे म्हणाले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: