Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayमुंबईत मनसे पदाधिकाऱ्याने केली महिलेला मारहाण...व्हिडीओ पाहून तुम्हालाही...

मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याने केली महिलेला मारहाण…व्हिडीओ पाहून तुम्हालाही…

मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे यांच्या (मनसे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केले. दुकानासमोर खांब लावल्याबद्दल मनसे नेत्याने वृद्ध महिलेशी केवळ धक्काबुक्कीच केली नाही, तर तिला थापड मारून नंतर खाली ढकलून दिले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून झालेल्या मारहाणीवरून मनसे पदाधिकाऱ्यावर जोरदार टीकाही होत आहे.

28 ऑगस्ट रोजी विनोद अरगिल यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबादेवी परिसरात गणपती मंडप उभारला आहे. तेथेच एका मेडिकल शॉपसमोर होर्डिंग लावण्यासाठी बांबू लावले जात होते. याला पीडित महिलेने विरोध केला. यानंतर झालेल्या वादातून ही मारहाण झाली, त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करत तिला थापड मारली.

हा व्हिडिओ स्वत:ला काँग्रेस नेता म्हणणाऱ्या कमलप्रीत कौर या महिलेने तिच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये मनसे नेत्यावर महिलेला थप्पड मारल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीचे नाव विनोद अरगिल असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक त्याला मागे ओढत असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान त्याचा प्रकाश देवीसोबत वाद झाला. दरम्यान, महिला पुढे गेल्यावर रागाच्या भरात त्या व्यक्तीने महिलेला थप्पड मारली आणि धक्काबुक्की केली. व्हिडिओ क्लिप 80 सेकंदांची आहे.

दुसरीकडे, मारहाणीच्या तीन दिवसांनी 31 ऑगस्ट रोजी तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आता लवकरच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी मनसेकडून याप्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: