Monday, May 6, 2024
Homeराज्यअमरावती बडनेरा मुख्य रस्त्याच्या अर्धवट कामाबाबत मनसे आक्रमक...

अमरावती बडनेरा मुख्य रस्त्याच्या अर्धवट कामाबाबत मनसे आक्रमक…

Share

अमरावती अनधिकृत मजार हटवून विकासाला गती देण्यासाठी मनसेचे कार्यकारी अभियंता बांधकाम विभागात आक्रमक ठिय्या आंदोलन…

शहर अध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन…

गुडीपाडवा सभेत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी अनधिकृत मजार व दर्ग्या वाढत असल्याने त्यामध्ये प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केले जात असण्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यानुसार अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील साहिल लॉन या ठिकाणी असलेल्या अनधिकृत तसेच विकास कामांच्या मध्ये अडथळा बनलेल्या मजारवर तीन ते चार महिन्यांपासून पत्रव्यवहार व पाठपुरावा केल्यानंतर कार्यवाही होत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अभियंता श्री म्हेत्रे साहेब यांच्या दालनात आक्रमकरित्या ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली,

त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चव्हाट्यावर आणला, त्यामध्ये फक्त मंदिरांवरच कार्यवाही करून इतरत्र कणभरही दखल न घेतक्याने अनधिकृत मजार वर कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक बांधकाम विभाग टाळाटाळ करत आल्याचा विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आले,

यावेळी सर्व पदाधिकारी व नागरिक बांधकाम विभागाच्या यांच्या दालनात कार्यवाही होईस्तोवर ठाण मांडून बसले होते,तरी बांधकाम विभागाकडून अति तातडीने व तत्परतेने या आंदोलनाची दखल घेतल्या गेली नाही व अनधिकृत मजार वर कारवाई केल्या गेली नाही तर आंदोलन याहीपेक्षा अधिक तीव्रपणे केल्या जाईल व अनधिकृत बांधकामासमोर मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसा पठण व कार्यक्रम घेण्यात येण्याबाबत शहर अध्यक्ष यांनी सांगितले तसेच बांधकाम विभागाच्या २२.०५.२०२३ पर्यंत लेखी स्वरूपात कार्यवाही करण्याचे लेखी पत्रदावरे बांधकाम विभागाकडून आश्वासन देण्यात आले ,

त्यावेळी पदाधिकारी शहर अध्यक्ष गौरव बांते, जिल्हा संघटक प्रवीण डांगे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावणेर, शहर संघटक बबलू आठवले, मनविसे राज्य कार्यकारणी सदस्य सुशील पाचघरे, शहर अध्यक्ष हर्षल ठाकरे,

मनकासे चिटणीस विकी थेटे, शहर सचिव राम काळमेघ, शहर उपाध्यक्ष पवन लेंडे, रुपेश कोठार, मयंक तांबूसकर, प्रणव देशमुख, अश्विन सातव, प्रवीण अतकरी, राजू ढोरे, मुन्ना डहाके, स्वप्निल निर्माते, राहुल कोळाबे, निलेश कदम ,बाळू चोरमले,मनोज भेर्डे उपस्थित होते…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: