Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayआमदार संजय राठोड यांना मंत्रीपद मिळालं...अन भाजपा नेत्या चित्र वाघ संतापल्या...म्हणाल्या...

आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद मिळालं…अन भाजपा नेत्या चित्र वाघ संतापल्या…म्हणाल्या…

गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळातील विस्तार 18 मंत्र्यांचा शपथविधीने नुकताच पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या दोन्ही मिळून 18 शपथविधी पार मात्र या मंत्रिमंडळात एकही महिलेचा समावेश नाही. या शपथविधी सोहळ्यामध्ये बीड येथील तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणातील वादग्रस्त शिवसेना आमदार संजय राठोड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या नेता चित्रा वाघ यांनी राठोड यांना मंत्रीपद देणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राठोड यांनी शपथ घेतल्याच्या पुढल्याच मिनीटाला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली.

“पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे,” असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसेच, “संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे,” असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या एका तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. तिने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. तिच्या सोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणावरून राज्यात प्रचंड गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं होतं.

भाजपाने थेट संजय राठोड यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळेच आज संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी उघडपणे त्याला विरोध केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: