Thursday, May 9, 2024
Homeराज्यराज्य शासनाने २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार...मनोज जरागे...

राज्य शासनाने २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार…मनोज जरागे पाटील…

Share

पातूर – निशांत गवई

ओबीसी व मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा छगन भुजबळांचा प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही मराठा समाजातील सर्वांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नसून राज्य शासनाने 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण दिल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशार मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी चरणगाव येथील सभेतून दिला असून ओबीसी नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ यांच्यावर चांगले राज्यांमध्ये ओबीसी व मराठा समाजामध्ये जातीय ते निर्माण करून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी चालवला असून त्यांचा हा प्रयत्न यशस्वी करावा यासोबतच स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेणारे छगन भुजबळ यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे मत व्यक्त करत मराठा समाजाला एकत्र येऊन ज्यांना कुणबी समाजाचे दाखले आहेत.

त्यांनी ज्यांच्याकडे कुणबी समाजाचे दाखले नाही त्यांच्या पाठीशी उभे राहावे व सर्व मराठा बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे हेच माझे ध्येय असून स्वतःच्या शेवटच्या श्वासापर्यंत आरक्षणाकरिता लढणार असल्याचे मत मनोज रंगे पाटील यांनी विदर्भ दौऱ्यावर आले असता चरणगाव येथील जाहीर सभेतून व्यक्त केले.

राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देणे भाग असून आम्ही त्यांना चार महिन्याचा वेळ दिला असून 24 डिसेंबर पर्यंत ठरल्याप्रमाणे राज्य शासनाने आरक्षण न दिल्यास पुन्हा आंदोलन करणार असून या आंदोलनाची दिशा ठरविण्याकरिता 17 डिसेंबर रोजी मराठा समाजातील सर्वांची एक बैठक बोलावली असून मराठा समाज माझे मायबाप आहेत व त्यांच्या आरक्षणाकरिता शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे.

आतापर्यंत आलेल्या राज्य शासनाने मराठा समाजाची केवळ बळवण केली असून 805 पासून मराठा समाजाच्या नोंदणी कुणबी असल्याचे दाखले मिळाले आता मिळत आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात आलेल्या राज्य शासनाने कोणतेही पुरावे मिळत नसल्याचे कारण समोर करून मराठा समाजाची बोळवण केली आहे आता मराठा समाजाचे 35 लाख दाखले सापडले असून हे दाखले कुठून आले.

असा प्रश्न उपस्थित करत आतापर्यंतच्या राज्य शासनाने मराठा आरक्षण दिले असते तर सकल मराठा समाज खूप पुढे गेला असता परंतु मराठा समाजाचे बोळवण केल्या जात असून आता मराठा समाज शुभ बसणार नाही राज्यामध्ये मराठा समाजाच्या 35 लाख नोंदणीसाठी सापडले असून त्या आधारे आता कुणबी प्रमाणपत्रे देणे सरकारला भाग आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे स्वतःला ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेतात परंतु आतापर्यंत त्यांनी ओबीसी च्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेतला आहे ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून भुजबळ यांनी 80 टक्के स्वतःचा फायदा करून घेतल्या असल्याचा आरोप सुद्धाओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धनगर समाजाबाबत आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी कुणबी समाज ओबीसी समाज व मराठा समाजामध्ये छगन भुजबळ यांना वाद निर्माण करून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

परंतु कोणतेही कायदा व स्वस्त हातात न घेता मराठा समाजातील युवकांनी शांततेने आंदोलन करण्याची सुद्धा त्यांनी या जाहीर सभेतून सांगितले मराठा समाजाला आरक्षण हे राज्य शासनाला द्यावे लागेल त्याकरिता दिलेला अल्टिमेटम हा शेवटचा असून यानंतर कोणताही अल्टीमीटर राज्य शासनाला आम्ही देणार नसल्याचे सुद्धा त्यांनी जाहीर सभेतून व्यक्त केले विदर्भातील खानदेशातील मराठा समाजाने एका ठिकाणी येऊन आरक्षणाकरिता एकमेकांना सहकार्य करण्याचे सुद्धा आव्हान त्यांनी व्यक्त केले.

राज्याचे कॅबिनेट मंदी गिरीश महाजन यांचा सुद्धा त्यांनी समाचार घेतला उपोषणाच्या वेळी राज्य शासनाची भूमिका घेऊन येणारे गिरीश महाजन सर्व मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असे बोलत असल्याने गाठ या मराठा समाजाची असून आरक्षण हा आमचा हक्काचे आहे व ते आम्ही मिळवणारच आमची विनंती आहे धनगर बांधवांचा वेगळा प्रवर्ग ओबीसी आरक्षणातुन केला गेला आहे, वंजारी बांधवांचाही केला गेला आहे त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही कारण आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोयअशी सुद्धा मत त्यांनी व्यक्त केले.

पातुर तालुक्यातील चरण गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाचे योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला जिजाऊ वंदना सुरुवात करण्यात आली जरांगे पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पृष्टी करण्यात आली जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्याकरिता पातुर तालुक्याचा जिल्हाभरातून मोठ्या संख्येने महिलावर्ग व नागरिक उपस्थित होते.

१) सभेतील ठळक मुद्दे
मराठ्यांना आरक्षण कसं जायचं हे लिहून घेतलेलं आहे त्यात जर बदल झाला तर राज्य शासनाने अवघड आहे, आम्हाला त्याच पद्धतीने आरक्षण हवं आहे आणि आम्ही तेच घेऊन राहणारजीव गेला तरी हरकत नाही पण मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू मला बघायचा आहे

२) मंत्री गिरीश महाजन चा समाचार
गिरीश महाजन म्हणतात सरसकट आरक्षण देता येणार नाही मग बर आहे तुमची गाठ पण आमच्या सोबत आहेहेच महाशय आंतरवालीला आले होते एकदा दोनदा नाहीतर चार वेळेस आले होते, पहाटेपर्यंत बसले होते, पहाटे साडेचार वाजेपर्यंत आमचं व्यासपीठ सोडलं नाही आता अंधा सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येणार नाही असे बोलत गिरीश महाजन यांचा समाचार घेतला.

३) मराठ्यांचा आतापर्यंत घात करण्यात आला
मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि मराठ्यांचा विश्वासघात झाला, समित्यांनी सांगायच मराठ्यांच्या नोंदी नाही अरे मराठे1805 पासून नोंदी सापडल्या, 1967 पासून ते 2023 पर्यंत सरकारने नोंदणी शोधायला सुरुवात केली ३५ लाख नोंदी सापडले विदर्भातील मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय, छगन भुजबळ म्हणतो मराठ्यांनी ओबीसी आरक्षणात येऊ नये तू कितीही अडवाये आला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: