Thursday, November 30, 2023
Homeखेळमोराच्या मृत्यूबाबत संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मनोज...

मोराच्या मृत्यूबाबत संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मनोज भिसे यांची मागणी…

Spread the love

सांगली – ज्योती मोरे

दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी कुपवाड मधील एका शेतात जखमी अवस्थेत पडलेल्या मोरास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी टॉवेलमध्ये गुंडाळून उपचारासाठी टू व्हीलर वरून घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

राज्य शासनामध्ये वन खाते हे स्वतंत्र खाते असून अशा वन्य प्राण्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र चारचाकी गाडीची व्यवस्था असणे गरजेचे असताही तशी व्यवस्था या जखमी मोराच्या बाबतीत का करण्यात आली नाही? असा सवाल मनोज भिसे यांनी उपस्थित करत,वनमंत्री सुधीर मुनगंटीवार याच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे संबंधीत अधिकार्यांसह,कर्मचार्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाईची ईमेलव्दारे मागणी केली आहे.

मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्याबाबतीत वनविभागाने असा हलगर्जिपणा करणे हा राष्ट्रद्रोहच असल्याचे भिसे यांनी म्हटले आहे. कोणत्याही जखमी वन्य प्राण्यावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा वन खात्याकडून राबवली जावी,जाग्यावर त्यांच्यावर उपचार व्हावेत,अशा प्राण्यांची ने आण करण्यासाठी स्वतंत्र वाहतुकीची व्यवस्था करण्यात यावी. अशा मागण्याही या निवेदनाद्वारे मनोज भिसे यांनी केल्या आहेत.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: