Friday, May 17, 2024
Homeराज्यअंबाळा तलावात बुडुन इसमाचा मृत्यु...

अंबाळा तलावात बुडुन इसमाचा मृत्यु…

Share

रामटेक – राजु कापसे

फुलं विसर्जनासाठी येथील अंबाळा तिर्थक्षेत्र येथे आलेल्या ४८ वर्षीय इसमाचा अंबाळा तलावात बुडुन करून अंत झाल्याची घटना आज दि. २ एप्रील ला दुपारी १.४५ वाजता दरम्यान घडली.

विजय धामाजी बिनेकर वय 48 वर्ष रा. कांजी हाऊस चौक नागपुर असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या चुलत भावाच्या पत्नीचे फुल विर्सजनाच्या कार्यक्रमाकरीता अंबाळा तलाव रामटेक येथे त्याच्या परिवारासह आला होता.

कार्यक्रम झाल्यानंतर सुमारे १.४५ वा दरम्याण तो आंघोळ करण्याकरीता अंबाळा तलावावर गेला असता अंघोळ करतांना मृतकाचा तोल जावुन तो पाण्यात पडुन बुडुन मरण पावला. मृतकाचा मोठा भाऊ नामे संजय धामाजी बिनेकर यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पो स्टे रामटेक येथे मर्ग क्र. १४/२०२४ कलम १७४ जा.फौ. अन्वये नोंद करण्यात आलेला आहे.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: