Homeराजकीयसांगली स्वतंत्र तालुका करा…आमदार सुधीर गाडगीळ यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन...

सांगली स्वतंत्र तालुका करा…आमदार सुधीर गाडगीळ यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन दिले…

Share

सांगली प्रतिनिधी:–ज्योती मोरे.

मिरज तालुक्याचे विभाजन करुन सांगली स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे दरम्यान या मागणीची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी याबाबतचा प् -स्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत, अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.

स्वतंत्र सांगली तालुक्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मिरज पश्चिम भागातील नागरिकांना विविध कामासाठी मिरज येथील तहसिल कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात प्रचंड अर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. मिरज पश्चिम भागातील नागरिकासाठी सांगली हे मध्यवर्ती ठिकाण आहे सद्या सांगली येथे अप्पर तहसिल कार्यालय आहे. मिरज पश्चिम भागातील ३१ गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान सांगली स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसंदर्भात आमदार गाडगीळ यांनी सोमवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेतली. मिरज तालुक्याची वाढणारी लोकसंख्या, मोठे क्षेत्रफळ, पश्चिम भागातील नागरिकांना होणारा त्रास हे लक्षात मिरज तालुक्याचे विभाजन करावे. सांगली स्वतंत्र तालुका करावा अशी मागणी केली. मंत्री विखे-पाटील यांनी याची तातडीने दखल घेत याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अतिरिक्त सचिवांना दिले आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: