Sunday, May 12, 2024
Homeसामाजिकमेजर रत्नाकर ठाकरे यांना 'पोलीस महासंचालक पदक' जाहीर कारगिल युद्धात उल्लेखनीय कार्य...

मेजर रत्नाकर ठाकरे यांना ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर कारगिल युद्धात उल्लेखनीय कार्य…

Share

नरखेड – अतुल दंढारे

महाराष्ट्र पोलीस दलात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ‘महासंचालक पदक’ जाहीर देऊन सन्मान करण्यात येतो.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,काटोल येथे चालक असणारे रत्नाकर ठाकरे यांना यावर्षीसाठी ‘महासंचालक पदक’ जाहीर झाले.

रत्नाकर ठाकरे हे माजी सैनिक असून कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली होती.तसेच मोवाड येथे दि.५ ऑगस्ट २०११ रोजी नरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत मोवाड चौकीवर जवळपास २ हजार जमावांनी हल्ला केला असता त्यामध्ये आपल्या प्राणाची परवा न करता २५ कर्मचारी व अधिकारी यांचे प्राण वाचवून शुरतेचा परिचय दिला,हल्लेखोरावर क्यू.आर.टी वाहन चालवून पाऊण तास त्यांना सळो की पळो करून सोडले.

त्यामुळे पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले होते.ती घटना म्हणजे वीरतेचा परिचय देणारी इतरांसाठी प्रेरणादायी होती. माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष मेजर रत्नाकर ठाकरे यांना महाराष्ट्र सरकार पोलीस खात्यातून महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “पोलीस महासंचालक पदक” देऊन नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवरील मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री यांचे शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.

मेजर रत्नाकर ठाकरे हे मनमिळाऊ स्वभावाचे असून काटोल-नरखेड परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.पोलीस दलात किंवा सैन्यात दाखल होणाऱ्या युवकांना ते नेहमीच मार्गदर्शन करतात.त्यांच्या मार्गदर्शनात शेकडो युवक सैन्यात दाखल झाले आहे.त्यांच्या यशाबद्दल परिसरातील माजी सैनिक संघटना,विविध सामाजिक संघटना, युवक संघटना, क्रिडा संघटना यांनी अभिनंदन केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: