Homeराज्यमहापारेषांच्या यंत्रचालकांची पेटली मशाल, आकृतीबंधामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर यंत्रचालकांचा राज्यव्यापी मेळावा...

महापारेषांच्या यंत्रचालकांची पेटली मशाल, आकृतीबंधामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर यंत्रचालकांचा राज्यव्यापी मेळावा…

Share

अकोला – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीतील लागू झालेल्या अन्यायकारक आकृतीबंधामुळे निर्माण झालेल्या यंत्रचंकांच्या समस्यांवर विचार मंथन करण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रचालक एकवटले आहेत.

विविध संघटनातील राज्यभरातील यंत्राचालक एकत्र येऊन यंत्रचालक संघर्ष समितीचा राज्यव्यापी मेळावा रविवारी अकोल्यात मोठया उत्साहात पार पडला. अन्यायकारक आकृतीबंधांवर विचार मंथन करून पुढील आंदोलनाची दिशा या मेळाव्यात ठरवण्यात आली. या मेळाव्यातून यंत्राचालकांनी मशाल पेटवून राज्यव्यापी लवकरच एल्गार पुकारण्याचा निश्चय केला.

अकोला येथील गड्डम प्लॉट स्थित चांडक मंगल कार्यालय येथे यंत्रचालक संघर्ष समिती अमरावती परिमंडळ यांचे वतीने राज्यस्तरीय यंत्रचालक मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला स्वाभिमानी वर्कास फेडरेशनचे कार्याध्यक्ष डी.बी बोर्डे केंद्रीय सरचिटणीस राजेश कठाळे.

इंटक संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष पंजाबराव देशमुख, राज्यसचिव अनिल गोरे, तांत्रिक कामगार युनियन 50 59 चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने, म.रा. तांत्रिक कामगार संघटना 1701 चे महापारेषण विंग चे केंद्रीय अध्यक्ष अजीज पठाण, मागासवर्गीय संघटनेचे शशिकांत इंगळे, कामगार सेनेचे गजानन शेंदरकर, महिला प्रतिनिधी माधुरी धर्माळे. मनीषा कनोजे आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम यंत्रचालक बांधवांच्या कामकाजात लागणारे साहित्य,लॉग बुकचे प्रतिकात्मक पूजन व विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. महापारेषण कंपनीत लागू झालेल्या अन्यायकारक आकृती बंधामुळे बाधित झालेल्या 372 यंत्रचालकांना डीमडेट मध्ये पदोन्नती देऊन यंत्रचालक प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कामात बदल करू नये,या प्रमुख मागणीसह अनेक महत्त्वाचे ठराव या मेळाव्यात घेण्यात आले.

यंत्रचालक संघर्ष समितीने ठरविलेल्या या भूमिकेला आलेल्या कामगार चळवळीच्या केंद्रीय पदाधिकारी यांनी पाठिंबा देऊन यंत्राचालक संघर्ष समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी वर्कस फेडरेशन तर्फे संतोष झुंजारे यांनी संघटनेची भूमिका विशद करून यंत्रचालक संघर्ष समितीच्या पुढील आंदोलनात संघटना सहभागी होईल असे आश्वासन दिले.

तर सचिन सराफ यांनीअमरावती परिमंडळ च्या वतीने मनोगत व्यक्त केले. तर प्रभाकर मालवे, प्रशांत महाजन यांच्यासह सर्व परिमंडळातून आलेल्या यंत्रचालक बांधवानी मते मांडली. या मेळाव्याला वाशी परिमंडळ,नाशिक परिमंडळ, संभाजीनगर परिमंडळ, नागपूर परिमंडळ,अमरावती परिमंडळ,पुणे परिमंडळ, कराड परिमंडळ येथून शेकडो यंत्रचालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्याची मुख्य भूमिका या मेळाव्याचे संयोजक शेख कयूम यांनी मांडली.

प्रस्तावना गोपाल गाडगे यांनी मांडली. सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी तर आभार शुभांगी मोगल यांनी मानले.
हा राज्यपापी मेळावा यशस्वी करण्यासाठी सचिन लाखे, जीत पाटील, विकास जाधव, रवींद्र चौँखण्डे, शाम चोपडे, डी व्ही देशमुख, कमलकिशोर शंभरकर, सुधाकर नवघरे, बाबाराव ठाकरे, अश्विन सपकाळ, संतोष उन्होने यांच्यासह अमरावती परिमंडळातील सर्व यंत्रचालकांनी परिश्रम घेतले. शेवटी मशाल पेटवून राज्यभरात यंत्रचालकांचा एल्गार पुकारण्याचा संकल्प करून समारोप करण्यात आला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: