Saturday, May 4, 2024
Homeराज्यमुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटक...दिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित...

मुं. म.साहित्य संघाचे सं.माऊली नाटक…दिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित…

Share

मुंबई – गणेश तळेकर

साहित्य संघाने निर्मिती केलेले प्रदिप ओक लिखित आणि प्रमोद पवार दिग्दर्शित संगीत माऊली नाटकाला विशेष निमंत्रित केले आहे.याचे संगीत- डॉ राम पंडित ,नेपथ्य- सुधीर ठाकूर,प्रकाश – श्याम चव्हाण यांची असून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या साहिल विशे,तन्वी गोरे, श्रेयस व्यास ,डॉ गौरी पंडित अशी नव्या दमाची मंडळी काम करीत आहेत.

नुकताच डॉ.गौरी पंडित हिला दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा उदयोन्मुख संगीत नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला. साहिल इंजिनिअरिंग तर श्रेयस कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तन्वी शास्त्रीय गायन, कथकमधेही पारंगत आहे. यांच्या जोडीला कविता विभावरी,आनंद पालव,मनोज नटे,सचिन नवरे आहेत.

विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या जीवन प्रवासावर हे नाटक बेतलेले आहे. सुमधुर संगीत आणि उत्तम अभिनय यामुळे रसिकांच्या मनाचा हे नाटक ठाव घेते. १५ फेब्रुवारी ला, श्रीराम सेंटर,नवी दिल्ली येथे सायं. ६ वाजता याचा प्रयोग सादर होईल. दिल्लीतील मराठी मंडळी, खासदार, सनदी अधिकारी खास निमंत्रित आहेत.


Share
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: