Homeराज्यपातूर घाटात लक्झरी बस चा अपघात, ५ प्रवासी गँभीर जखमी...

पातूर घाटात लक्झरी बस चा अपघात, ५ प्रवासी गँभीर जखमी…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर :पुणे येथून खुराणा ट्रॅव्हल्स ची स्लीपर कोच बस हि अकोला येथे येत असताना पातूर घाटात या बस चा वेग अनियंत्रित झाल्या मुळे अपघात झाला या अपघातामध्ये माळराजुरा फाटा येथून काही प्रवासी पातूर येथे जाण्याकरिता बसले होते तेथून अर्धा किमी अंतरावर च हा अपघात झाला आहे.

या बसमध्ये इतर कोणी प्रवासी नसल्याने व हि बस रिकामी असल्याने खूप मोठी जीवित हानी टळली अपघाताची माहिती भाजयुमो शहर अध्यक्ष सचिन बारोकार यांना कळल्यावर। त्यानी ठाणेदार किशोर शेळके याना माहिती देऊन 108 मास्क कॅज्युएलिटी अंतर्गत वाडेगाव, बाळापूर, पातूर च्या रुग्णवाहिका बोलावून आज कर्त्यव्यवर नसताना सुद्धा माणुसकी जोपासून घटनास्थळी धाव घेऊन जखमी ना पातूर पोलिसांच्या मदतीने उपचारार्थ दवाखान्यात हलविले.

या अपघातामध्ये अनिल पहुरकार, अक्षय नांदेडकर, अर्जुन कांबळे, जगनाथ तेलगोटे नारायण शिंदे गंभीर जखमी जखमी ना अकोला सामान्य रुग्णालय येथे 108 रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले आहे. तसेच सदर अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच जागेवर या आधी 2 ट्रक चा अपघात झाला आहे या मुळे रोड च्या बाजूची सुरक्षा कवच हे येथे मागील 2 महिन्यापासून तुटले आहे.अपघात घडल्यावर एका बाजू ची वाहतूक थांबूवुन ती दुसऱ्या बाजूला सुरु करण्यात आली होती पातूर पोलीस स्टेशन चे वाहतूक कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळावर पंचनामा करून रोड च्या मधोमध असलेली बस बाजूला करून वाहतंतुक सुरळीत केली


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: