Homeगुन्हेगारीप्रेयसीच्याच ओढणीने गळफास घेऊन प्रियकराची आत्महत्या...

प्रेयसीच्याच ओढणीने गळफास घेऊन प्रियकराची आत्महत्या…

Share

मौदा मार्गावरील सैराट लॉज मधील घटना

प्रेयसी बाथरूमला जाताच उचलले टोकाचे पाऊल

रामटेक – राजू कापसे

रामटेक येथील नगरधन मार्गावरील सैराट लॉजमध्ये कथित प्रियकर व प्रेयसी रूम करून एकांतात होते. परंतु काही वेळानंतर प्रेयसी बाथरूमला गेली. ही संधी साधून कथित २२ वर्षीय प्रियकराने तिच्याच ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (४ एप्रिल) दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मृतक प्रियकराचे नाव मुकेश म्हैसूर भोंडेकर (२३), असे आहे. तर प्रेयसी समवयस्क असून ती देवलापार परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृतक मुकेश व त्याची प्रेयसी दोघेही दुपारच्या सुमारास सैराट लॉजमध्ये आले. भाड्याने खोली घेतली. दोघेही दोन तास खोलीत होते.

दरम्यान, प्रेयसी बाथरूममध्ये जाताच प्रियकराने ओढणीच्या साहाय्याने खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बाथरूममधून ती खोलीकडे गेल्यानंतर प्रियकराला गळफास लावलेल्या अवस्थेत बघून घाबरली. आरडाओरड करीत हॉटेलमालक आणि व्यवस्थापकांकडे मदतीसाठी धाव घेतली. तातडीने गळफास काढण्यात आला. तोपर्यंत मुकेश बेशुद्धावस्थेत होता, अशी माहिती आहे.

तातडीने त्याला खासगी वाहनातून रामटेक उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबतची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी कथित प्रेयसीच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. घटनेनंतर मृतक आणि प्रेयसीकडील नातेवाइकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. एकमेकांवर आरोप सुरू होते, अशी माहिती आहे. रामटेक पोलीसांनी मर्ग दाखल केला असुन पुढील तपास सुरु आहे.

मुलीच्या चारित्र्यावर संशय, घेतले टोकाचे पाऊल

पोलीस सुत्रांनुसार दोघांचेही रिलेशन जवळपास वर्षभऱ्यापासुन होते. रिलेशन एवढे घट्ट झाले की गोष्ट लग्न करण्यापर्यंत पोहोचली. मात्र मध्येच ‘ संशयाच्या ‘ बाबीने घात केला. मुलगा मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला व येथेच घात झाला. लॉजमध्ये असतांना मुलगी बाथरूममध्ये जाताच मुकेशने टोकाचे पाऊल घेत मुलीच्याच ओढनीने गळफास घेत स्वतःचे जिवन संपविले.

हॉटेल, लॉजमध्ये सर्रास गैरकृत्य

स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे परिसरातील अनेक हॉटेल, लॉजमध्ये नियम व सूचना धाब्यावर बसवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे. येथे कथित जोडप्यांना सहज रूम उपलब्ध होत आहेत. याशिवाय, परिसरातील हॉटेल व ढाब्यांवर अवैधरीत्या दारू उपलब्ध होते.

त्यामुळे रामटेक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन महिन्यांपुर्वी येथुन बदली होवुन गेलेले उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे यांचे कार्यकाळात अवैध धंदेचालकांचे व विशेषतः लॉज मालकांचे धाबे दणानले होते. मात्र आता तसे दृष्य दिसुन येत नाही.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: