Sunday, May 12, 2024
Homeसामाजिकराष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने बसवाण्णा जयंतीनिमित्त बसवरत्न पुरस्कारांचे वितरण होणार - संस्थापक...

राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने बसवाण्णा जयंतीनिमित्त बसवरत्न पुरस्कारांचे वितरण होणार – संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले…

Share

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने महात्मा बसवाण्णा जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी लिंगायत माळी मंगल कार्यालयात बसवरत्न पुरस्कार वितरण समारंभ खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

तर सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र बोळाज, सांगली जिल्हा क्रीडाई असोसिएशनचे अध्यक्ष जयराज सगरे,नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, हिंगणगावच्या सरपंच प्रिया सावळे, उत्कृष्ट खेळाडू आदिती आणि आर्यन हारगे, तसेच, भूगोल विषयात पीएचडी प्राप्त डॉ. प्राध्यापक रवीकरण कोरे यांचे सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहेत. अशी माहिती आज हॉटेल हनुमान मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले यांनी दिली आहे.

दरम्यान सदर कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,जनसुराज्य पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम, अनिता सगरे, बसवरत्न पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ.विनोद परमशेट्टी, राष्ट्रीय लिंगायत संघाचे समन्वयक संजय हिरेकर, उपाध्यक्ष राजशेकर तंबाखे, सचिव मिलिंद साखरपे, समन्वयक ज्ञानेश्वर खर्डे, महाराष्ट्र सभा सहचिटणीस गुरुपादप्पा पडशेट्टी, तसेच शिवबसव कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बुकटे आधी पदाधिकारी सदर कार्यक्रमाचे नियोजन करत असल्याची माहिती प्रदीप वाले यांनी दिली आहे.यावेळी समन्वयक संजय हेरेकर, रवींद्र बोकटे, कैलास स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: