Thursday, May 9, 2024
HomeBreaking Newsचला लागा कामाला!...राज्यात लवकरच 'या' निवडणुकांचे बिगुल वाजणार...कोणत्या होणार निवडणुका?...

चला लागा कामाला!…राज्यात लवकरच ‘या’ निवडणुकांचे बिगुल वाजणार…कोणत्या होणार निवडणुका?…

Share

निवडणुका जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भावी नगरसेवकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने खुशखबर दिली असून राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुका घेण्याची संकेत दिले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या परिपत्रकात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी तयारी करायला सुरुवात करायला हरकत नाही. हे परिपत्रक आजी माजी नगरसेवक सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करीत आहे.

निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजी यासंदर्भातलं परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये राज्य विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. “दिनांक १ जुलै २०२३ रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे”, असं या अधिसूचनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाने नमूद केलं आहे.

राज्यात 23 महानगरपालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदांच्या निवडणुका महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समित्यांच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा प्रलंबित आहे. या सर्व निवडणुकांची वाट स्थानिक पातळीवर पाहिली जात होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: