Saturday, May 4, 2024
Homeराज्यकायदेशीर रस्ते बांधकामाला बेकायदेशीर साठमारीचे ग्रहण...

कायदेशीर रस्ते बांधकामाला बेकायदेशीर साठमारीचे ग्रहण…

Share

कोकण – किरण बाथम

खेडेगावात रस्त्यांना खुप महत्व आहे. मात्र अजूनही चांगले ठेकेदार नसल्याने कामे सुमार दर्जाची होतात. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर-पाली रस्त्याला मात्र चांगले काम होतंय म्हणून अडचण निर्माण केली जात आहे.

अर्धवट रस्त्याच्या कामावर यामुळे काहींनी वादविवाद केले.काहीही अघटीत घडण्यापूर्वी प्रकरण शेवटी पोलीस विभागाकडे गेले.याप्रकरणी ठेकेदाराने पोलीस तक्रार दाखल करून जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन व्यथा मांडली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्या प्रमाणे त्यांच्या देखरेखी खाली उत्तम काम सुरु आहे. मात्र एक गाव बारा भानगडी करणाऱ्यांना केवळ निमित्त हवे असते. पण अशाने गावाचा विकास खुंटतो. पंधरा गावे आणी वाडीवस्त्यांना या रस्त्याचा लाभ होणार आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: