Thursday, May 9, 2024
Homeराज्यव्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ किनवट बंद...

व्यापाऱ्याच्या हत्येच्या निषेधार्थ किनवट बंद…

Share

नांदेड – शुभम शिंदे

शहरातील व्यापारी व्यंकटेश कंचरलावर आणि श्रीकांत कंचरलावर यांच्यावर मालमत्तेच्या वादातून काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात श्रीकांत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची मृत्यूशी ही झुंज अपयशी ठरली आणि आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला। या निषेधार्त व्यापारी संघटनांकडून शहर बंदची हाक देण्यात आली.

तसेच जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात पैशाची मागणी केल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्र मध्ये सध्या भ्रष्टाचाराचा कळस होत असल्याचा पाहायला मिळत आहे किनवट मध्ये व्यापाऱ्यांवरती जीवघेणा हल्ला झाला ज्यामध्ये एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे आणि आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा पोलीस प्रशासन पैसे मागत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एकीकडे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे स्वतः गृह खाता आहे त्यांनी कालच विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला लावेल अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही असं भर सभेत ठणकावून सांगितलं मग जर पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा पैसे मागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी मान खाली घालायला लावेल अशी गोष्ट नाही का.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: