Monday, May 6, 2024
Homeराज्यकिड्स पॅराडाईज चा यथार्थ बोचरे नवोदय साठी पात्र...

किड्स पॅराडाईज चा यथार्थ बोचरे नवोदय साठी पात्र…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चा विद्यार्थी यथार्थ गणेश बोचरे याने जवाहर नवोदय विद्यालय पात्र परीक्षेत बाजी मारली आहे. केंद्र सरकार अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली.

यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल चा विद्यार्थी यथार्थ गणेश बोचरे याने प्राविण्य मिळवून नवोदय साठी पात्र ठरला आहे.

यावेळी त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळेचे संस्थापक गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते यथार्थ चा सत्कार करण्यात आला.

यावेळी यथार्थ चे वडील ब्लॅक कमांडो गणेश बोचरे प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अश्विनी अंभोरे यांनी केले तर नरेंद्र बोरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी रवीकिरण अवचार, उमेर सर आदी उपस्थित होते. त्याने त्याच्या यशाचे श्रेय शिक्षक आई, वडील यांना दिले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: