Wednesday, November 29, 2023
Homeराज्यखामगाव | काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला…

खामगाव | काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला…

Spread the love

हेमंत जाधव

मा. श्री. अशोक रमेश थोरात, साहेब, अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांना गुप्त बातमीदारकडुन बातमी मिळाली की, संशयास्पद तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी ट्रक क्रमांक MH- 37-J-1189 ने नांदुरा येथुन नागपूर कडे घेवुन जात आहे.

त्याची सत्यता पडताळणीकामी व कायदेशिर कार्यवाही करीता सपोनि सतीश आडे व पोहेकॉ / 566 रामचंद्र भोपळे, पोहेकॉ / 492 श्रीकृष्ण नारखेडे, पोहेकॉ / 1413 सुधाकर थोरात, पोहेकॉ / 1526 निलेश चिंचोलकर, पोकॉ / 503 हिरा परसुवाले पथक अपर पोलीस अधीक्षक, खामगांव यांना आदेशीत करण्यात आले.

बातमीनुसार दिनांक 22.09.2023 रोजी पो.स्टे. खामगांव शहर हद्दीत नवीन बायपासवर जयपुर लांडे शिवारात शेगांव रोडवरील उड्डाण पुलावर 02.45 वाजता ट्रक क्रमांक MH- 37 – J-1189 हा नांदुरा कडुन येतांना दिसला. ट्रक चालक रविंद्र शेषराव महल्ले वय 45 वर्ष रा. गाडगेनगर, जुने शहर, अकोला, तसेच त्यांचे सोबतचे ट्रक चे क्लिनर नरेश निळकंठ मेश्राम वय 42 वर्ष रा. डाबकी रोड, गोंडपुरा,

अकोला यांना पोलीसांनी त्यांचापरीचय देवून तसेच वाहनात असलेल्या मालाची तपासणी बाबतचा उद्देश समजावून सांगुन ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पोतडीत तांदुळाचे प्रत्येकी अंदाजे 50 किलो वजनाचे अंदाजे 500 कट्टे प्रती किलो 15/- रु. प्रमाणे एकुण 3,75,000/- रु किंमती चा संशयास्पद तांदुळ तसेच ट्रक किंमती अंदाजे 18,00,000/- रु असा एकुण 21,75,000/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर माल व ट्रक चालक व क्लिनरसह पो.स्टे. खामगांव शहर येथे आणण्यात आले असुन पुढील कार्यवाही पो.स्टे. खामगांव शहर हे करीत आहेत. सदर कार्यवाही मा. श्री. सुनिल कडासने साहेब,

पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मागर्दशनाखाली श्री अशोक थोरात साहेब अपर पोलीस अधीक्षक, खामगांव तसेच श्री विनोद ठाकरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगांव यांचे आदेशाने सपोनि सतीश आडे व सोबत पोहेकॉ रामचंद्र भोपळे, पोहेकॉ श्रीकृष्ण नारखेडे, पोहेकॉ सुधाकर थोरात, पोहेकॉ निलेश चिंचोलकर, पोकॉ हिरा परसुवाले यांनी केली आहे.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: