Friday, May 3, 2024
Homeराज्यखादी ग्रामोद्योग मंडळातर्फे वाडेगाव येथे गुरूवारी मेळावा...

खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे वाडेगाव येथे गुरूवारी मेळावा…

Share

अकोला – संतोषकुमार गवई

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांचा लाभ व माहिती नागरिकांना मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयातर्फे जनजागृती मेळावा उद्या (15 फेब्रुवारी) वाडेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात होणार आहे. या मेळाव्यात इतरही शासकीय विभाग सहभागी होतील.

मंडळामार्फत पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, मध केंद्र योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ महिला, युवक-युवती, आदिवासी बांधव, सर्व समाजघटकांना व्हावा यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखडे यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: