Friday, May 10, 2024
HomeराजकीयKarnataka Election | कर्नाटकात २२४ जागांसाठी मतदान सुरू…'या' दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला...

Karnataka Election | कर्नाटकात २२४ जागांसाठी मतदान सुरू…’या’ दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…

Share

Karnataka Election 2023 : कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक बडे नेते आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः निवडणूक लढवत आहेत. याशिवाय माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी असे अनेक दिग्गज रिंगणात आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी, शिगगाव येथील मतदान केंद्र क्रमांक-102 वर मतदान केले. मतदान केल्यानंतर ते म्हणाले की, मला कर्नाटकच्या जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करायचे आहे आणि कर्नाटकच्या 5 वर्षांच्या भविष्यासाठी मतदान करावे. मी मतदान करून लोकशाहीप्रती माझे कर्तव्य पार पाडले आहे, यावेळी मी विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असून भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. विकास आणि नकारात्मक प्रचार यांच्यातील ही लढाई आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: