Sunday, May 5, 2024
Homeगुन्हेगारीचारित्र्याच्या संशयावरून पत्नी व पोटच्या दोन मुलाची हत्या...कागल येथील घटना...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व पोटच्या दोन मुलाची हत्या…कागल येथील घटना…

Share

कागल – राहुल मेस्त्री

चारित्र्याच्या संशयावरून एका इसमाने आपल्या पत्नीची व पोटच्या दोन मुलांची हत्या केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहरात घडलेली आहे ..या घटनेने संपूर्ण कागल शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत अधिक माहिती अशी की दि. 27 रोजी कागल येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये राहणाऱ्या प्रकाश बाळासो माळी (वय 36) या इसमाने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा दुपारी दोनच्या दरम्यान गळा आवळून हत्या करून घरातील एका खोलीत ठेवले होते.

सायंकाळी पाच वाजता त्याचा मुलगा कृष्णा माळी (वय 13) हा शाळेतून घरी आल्यानंतर त्या आपल्या आईला जिवे मारलेले पाहून रडू लागल्याने प्रकाशाने कृष्णाला देखील गळा आवळून जिवे मारुन त्याच ठिकाणी ठेवले होते.

सायंकाळी साडेसातच्या दरम्यान त्याची मुलगी आदिती माळी (वय 16 )ही घरी आली असता तिने आई आणि भावाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. तिला शांत करण्याचा प्रकाशने प्रयत्न केला पण तिने आरडाओरड केल्याने प्रकाशने आदितीला देखील वरवंटा डोक्यात घालून जिवे मारले. यामुळे अदिती रक्तबंबळ झाली होती.

हे तिन्ही मृतदेह एकाच खोलीत त्याने ठेवले होते. आरोपी प्रकाश हा साखर कारखान्यात कामाला असून पत्नी आणि त्याच्यात नेहमी वाद होत असत. पत्नीने कोणासोबत तरी फोनवर बोलल्याने वाद होऊन हा हत्याकांड झाल्याचे समजते. दुपारी दोन ते रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली.

हे कृत्य करून प्रकाशने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण पत्नी आणि मुलांना संपवले असे सांगितले. मात्र सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र पुन्हा एकदा त्याने सांगितल्याने पोलिसांनी त्याच्या बोलण्याची खात्री केली असता पोलीसांना मोठा धक्का बसला.

या हत्याकांड्याने कागल शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला .त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेनंतर कागल शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: