Friday, May 24, 2024
Homeकृषीकृ.उ.बा.स. रामटेक च्या प्रवेशद्वाराचे केदारांच्या हस्ते उद्घाटन...

कृ.उ.बा.स. रामटेक च्या प्रवेशद्वाराचे केदारांच्या हस्ते उद्घाटन…

नाली बांधकाम तथा सी.एस.सी. सेंटर चे ही उद्घाटन

रामटेक – राजु कापसे

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक च्या प्रवेशद्वारासह नाली बांधकाम व सी.एस.सी. सेंटर चे उद्घाटन आज दि. १८ जानेवारीला माजी राज्यमंत्री सुनील केदार यांचे हस्ते दुपारी १.३० वाजतादरम्यान पार पडले.

यावेळी प्रामुख्याने माजी राज्यमंत्री तथा नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजेंद्र मुळक, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, कृ.उ.बा.स. रामटेक चे सभापती सचीन किरपान हे उपस्थीत होते.

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक च्या वतीने सदर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सभापती सचिन किरपान व त्यांच्या संचालक मंडळाने निवडून येताच येथे विविध विकासकामे पार पाडण्याचे सत्र सुरू केले. दरम्यान येथे प्रवेशद्वार, भुमिगत नाली तथा धानाची नोंदनी, ऑनलाईन सातबारा शेतकर्‍यांना मिळण्यासाठी सी.एस.सी. सेंटर ची कमतरता होती.

हीच बाब हेरून सभापती सचिन किरपान यांनी याविषयीच्या सर्व बाबींची पूर्तता करत आज भूमिपूजनाचा सोहळा आयोजित केलेला होता. ठरल्यानुसार आज दिनांक 18 जानेवारीला दुपारी दीड वाजता दरम्यान माजी राज्यमंत्री सुनील केदार यांचे रामटेक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आगमन झाले.

यानंतर येथे भरलेल्या सभेमध्ये सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर प्रवेशद्वार , नाली बांधकाम तथा सीएससी सेंटर यांचे सुनील केदार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर स्वागत सत्काराचा कार्यक्रम सुरू झाला यामध्ये माजी राज्यमंत्री सुनील केदार माजी राज्यमंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र मुळक, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, सभापती सचिन किरपान यांचेसह विविध मान्यवरांचा येथे सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनियुक्त सरपंच उपसरपंच व काही विद्यमान सरपंच यांचाही सत्कार करण्यात आला त्यामध्ये मिसार , डडुरे, जयश्री मडावी, श्रीकिशन उईके, विजय भुरे, अमीत कोडवते, प्रदीप बादुले, पंचफुला मडावी, रवी कुंभरे, उपसरपंच देवेंद्र डोंगरे , महेंद्र दिवटे, उपसरपंच गायकवाड यांचा समावेश होता.

तसेच यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील बांधकामे पार पाडणारे कंत्राटदार विश्लेश माकडे तथा इतरांचा सुद्धा सुनील केदार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुंभरे तसेच नरेश बर्वे , चंद्रपाल चौकसे , राजेंद्र मुळक , सभापती सचिन किरपान व सुनील केदार यांचे भाषणे होवुन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी उपस्थितांमध्ये माजी राज्यमंत्री तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील केदार, माजी राज्यमंत्री तथा नागपुर जिल्हा काँग्रेस कमेटी चे अध्यक्ष राजेंद्र मुळक, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, सभापती सचिन किरपान, जि.प. सदस्या शांता कुंभरे, कलाताई ठाकरे, सरपंच जयश्री मडावी, कृ.उ.बा.स. रामटेक उपसभापती लक्ष्मी कुंभरे, महेश बमनोटे माजी सभापती,

अस्मीता बिरणवार पं.स. सदस्य, स्वप्नील श्रावणकर, सुभाष तडस, नरेश बर्वे, अशोक चिखले यांचेसह नागरिक व शेतकरी, आडतिया दलाल, विविध ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. राजकियांकडुन सभापतींचे कौतुक
कार्यक्रमाला विविध राजकीय मंडळी उपस्थित होते दरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून सभापती सचिन किरपान यांच्यावर कौतुकाचा वर्षावच केला.

निवडून आल्यावर नवनियुक्त सभापती तथा संचालक मंडळांनी येथे विविध विकासकामांचा जणु सपाटाच लावलेला असून ते पूर्णत्वास नेण्याचे धाडसही त्यांनी करून दाखविले असल्याचे राजकीयंकडून यावेळी बोलण्यात आले. माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी येथील विविध विकास कामांना काही अडथळे आल्यास मी मदतीस तत्पर राहील असे बोलून दाखविले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments