Thursday, May 9, 2024
Homeराज्यके.डी.सी.ए. इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, उजळाईवाडी येथे एम्पॉयिबीलीटी एन्हान्समेंट ॲन्ड युथ लाइवलीहुड कार्यशाळेचे...

के.डी.सी.ए. इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, उजळाईवाडी येथे एम्पॉयिबीलीटी एन्हान्समेंट ॲन्ड युथ लाइवलीहुड कार्यशाळेचे आयोजन…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

उजळाईवाडी: नांदी फाउंडेशन:महिंद्रा प्राईड स्कुल यांचे विद्यमाने केडिसीए इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, उजळाईवाडी येथे विध्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी एम्पॉयिबीलीटी एन्हान्समेंट ॲन्ड युथ लाइवलीहुड या सहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन दि. 28 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2022 करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. रविंद्र हिरेमठ यांनी ट्रेनर सौ. किर्ती गाडे यांचे स्वागत करुन विध्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दुर करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्यामध्ये रोजगारक्षमता निर्माण करणे व त्यांच्यात सामाजीक भान निर्माण करुन जबाबदार नागरीक बनविणे हेच या कार्यशाळेचे उद्धिष्ट असल्याचे सांगितले.

सौ. कीर्ती गाडे यांनी सहा दिवसात एकुण 40 तासांमध्ये संस्थेतील विध्यार्थिनींना सॉफ्ट स्किल्स, हार्ड स्किल्स, कम्युनिकेशन स्कील्स, इंटरव्ह्युव स्किल्स, इंटरव्ह्युव अटायर, लाईफ स्किल्स, रिसर्च, क्रिएटिवीटी, फायनान्स लिटरसी व इनोवेटिव आईडियास या विषयावर अत्यंत सुरेख मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी काही टेस्ट्स, गृप डिस्कशन्स व प्रशिक्षनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करण्यावर भर दिला. कार्यशाळेनंतर सर्व विध्यार्थिनींनी सकारात्मक प्रतीसाद नोंदविला व या कार्यशाळेमुळे त्यांच्यात अमुलाग्र बदल झाल्याचे व त्यांच्या पुढिल प्रगती मध्ये या कार्यशाळेचे खुप योगदान असेल असे मत व्यक्त केले.

ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट ऑफीसर प्रा. अमित बेलेकर यांनी नांदी व महींद्रा यांनी रोजगारक्षम तरुण निर्माण करण्यासाठी राबविलेले विनामुल्य प्रयत्न व कार्य विषद करुन महिंद्रा प्राईड क्लासरुम प्रोजेक्टच्या रिजनल ऑफीसर सौ. सिमा भागवत व को-ऑर्डिनेटर, महाराष्ट्र राज्य श्री. पंकज दांडगे यांचे हि कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आभार मानले.

त्यांनी या कार्यशाळेचा मागिल सहा वर्षातील विध्यार्थ्यांना खुप फायदा झाल्याचे सांगितले. यावेळी प्रा. प्रशांत सालियन, प्रा. प्रदिप राजमाने, प्रा. अभिजीत शिरगुप्पे, प्रा. श्वेता जगताप, प्रा. मयुरी शिंदे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सुरभी शहा यांनी सुत्रसंचालन केले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: