Monday, June 17, 2024
spot_img
Homeराज्यजय श्रीराम ग्रुप तर्फे तरण तलाव येथील विद्यार्थ्यांचा सत्कार...

जय श्रीराम ग्रुप तर्फे तरण तलाव येथील विद्यार्थ्यांचा सत्कार…

अकोला – गेल्या १८ वर्षांपासून सामाजिक सेवा व विद्यार्थ्यानंसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जय श्रीराम ग्रुपच्या वतीने वसंत देसाई येथील तरण तलावावर सुरू असलेल्या बालक जलतरण प्रशिक्षण शिबिरात सत्कार समारोह आयोजित करण्यात आला.यंदा शाळांना सुट्ट्या सुरू झाल्यापासून पोहण शिकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला ,गत वर्षांपासून यंदाची उपस्थिती ही लक्षणीय होती, यंदाच्या शिबिरात 5 वर्षांपासून ते 60 वर्षांपर्यंतचे विद्यार्थी दिसून आले.

यामुळेच पोहण्याप्रती लहान मुलांची आवड अधिक वाढली असल्याचं दिसून आलं.लहान मुलांचा उत्साह वाढवावा आणि त्यांना पोहण्याप्रती आवड निर्माण व्हावी याकरिता दर वर्षी श्रीराम ग्रुप आणि मास्टर पॉवर स्विमिंग तर्फे शिबिरात येणाऱ्या मुलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.आज पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चे कंपनीला चॉकलेट, बिस्कीट, दूध, गिफ्ट देण्यात आले.श्री राम ग्रुपचे पवन केडिया यांनी यावेळी पोहण्याच महत्व उपस्थितांना पटवून दिलं.

प्रत्येकाला पोहण आलं पाहिजे याकरिता येथे श्रीराम ग्रुपचे सदस्य ऍड.राधेश्याम मोदी, पवन केडीया, डॉ. राजेश काटे, नंदुभाऊ बुलबुल , संतोष तोष्णीवाल, हेमेन्द्र राजगुरू , दिनेश भाई गोडा , घाटोडे काका , दीपक मायी सोबतच मास्टर पॉवरचे संचालक गोपाल पाटील , सुशील कांबळे , प्रमोद खंडारे , दीपक सदांशिव आणि स्टाफ अथक परिश्रम घेतात..

या कार्यक्रमात नरेंद्र राठी, नरेंद्र तापडीया, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. मधुसूदन बगडीया, डॉ. के. के. अग्रवाल, डॉ.केडीया, डॉ.किरण लढ्ढा , मनोज बोधाणी , गोपाल चौधरी, दिलीप जैन, अरुणकुमार सिन्हा , राजेश परमार , ऍड. मनमोहन सारडा, भिरड साहेब , अरुण बजाज , रेखचंद भन्साली समवेत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: