Friday, September 22, 2023
Homeक्रिकेटइशान किशनने केली विराटची नक्कल...पहा टीम इंडियाची मस्ती...व्हिडिओ पाहिल्यावर हसू आवरणार नाही...

इशान किशनने केली विराटची नक्कल…पहा टीम इंडियाची मस्ती…व्हिडिओ पाहिल्यावर हसू आवरणार नाही…

न्युज डेस्क – नुकताच भारताने आशिया कप जिंकला, श्रीलंकेवर भारताने दणदणीत विजय प्राप्त करून जल्लोष साजरा केला. या आशिया कपदरम्यान भारतीय संघाची मस्ती बघायला मिळाली. त्या मस्तीचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

विराट युवा खेळाडूंसोबत मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. एक-दोन वर्षापूर्वी पदार्पण केलेले युवा खेळाडूही विराटसोबत खूप कम्फर्टेबल आहेत. याचे उदाहरण 2023 च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर पाहायला मिळाले.

भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले. विराट कोहलीसोबत इशान किशन, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि तिलक वर्मा उभे होते.

त्यानंतर ईशानने विराट कोहलीची नक्कल करण्यास सुरुवात केली. तो विराटसारखा वागू लागला. यावेळी कोणाचेही हसू आवरले नाही. यानंतर विराटनेही इशानच्या चालण्याची नक्कल केली आणि सगळे हसायला लागले. यानंतर ईशानने पुन्हा एकदा विराटप्रमाणे थोडे चालून दाखविले.

भारतीय संघाने 8व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ सलग दुसऱ्यांदा आशिया चषकाच्या एकदिवसीय स्वरूपाचा चॅम्पियन बनला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा संघ भारतासमोर टिकू शकला नाही. नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजच्या धारदार गोलंदाजीसमोर संघाचा डाव अवघ्या 50 धावांवर आटोपला.

भारताने हे लक्ष्य अवघ्या 37 चेंडूत पूर्ण केले. टीम इंडियाने 263 चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. चेंडू शिल्लक असताना भारताचा वनडेमधला हा सर्वात मोठा विजय आहे. सिराजने 21 धावांवर श्रीलंकेच्या 6 फलंदाजांना बाद केले. त्याने एकाच षटकात चार बळी घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: