Thursday, May 9, 2024
HomeIPL CricketIPL 2024 Auction | पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू...कोणत्या संघाने...

IPL 2024 Auction | पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू…कोणत्या संघाने त्याला घेतले?…

Share

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 च्या लिलावात पॅट कमिन्सने (Pat Cummins) इतिहास रचला आहे. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कमिन्सला 20 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी करून त्याच्या संघात समाविष्ट केले आहे. असे करून कमिन्सने सॅम करनचा विक्रम मोडीत काढला आहे.

करनला 2023 मध्ये पंजाब किंग्सने 18.5 कोटी रुपयांना विकत घेतले आणि त्यांच्या संघात समाविष्ट केले. हैदराबाद, आरसीबी आणि सीएसकेने पॅट कमिन्सला विकत घेण्यासाठी बोली लावली होती, शेवटी हैदराबादने सर्वाधिक बोली लावली आणि पॅट कमिन्सचा त्यांच्या संघात समावेश केला.

त्याच वेळी, आयपीएल 2024 च्या लिलावात, राजस्थानने रोवमन पॉवेलला 7.40 कोटी रुपयांना खरेदी केले आणि त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. आयपीएल 2024 च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू सध्या पॅट कमिन्स आहे ज्याला लिलावात विक्रमी 20 कोटी 50 लाख रुपये मिळाले आहेत.

त्याचवेळी, या लिलावात पंजाबने हर्षल पटेलला 11.75 कोटी रुपयांना विकत घेत त्याला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. IPL 2024 च्या लिलावात हर्षल पटेल हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू


पैट कमिंस (20 करोड़, 50 लाख), सनराइजर्स हैदराबाद (2024)
सैम कुरेन (18.5 करोड़) पंजाब किंग्स, 2023
कैमरून ग्रीन (17.5 करोड़) मुंबई इंडियंस, 2023
बेन स्टोक्स (16.25 करोड़), सीएसके, 2023
क्रिस मॉरिस (16.25 करोड़) राजस्थान रॉयल्स, 2021
निकोलस पूरन (16 करोड़),लखनऊ सुपरजायंट्स, 2023
युवराज सिंह (16 करोड़)    , दिल्ली कैपिटल्स, 2015
पैट कमिंस (15.5 करोड़)कोलकाता नाइट राइडर्स, 2020
ईशान किशन (15.25 करोड़), मुंबई, 2022
काइल जैमिसन (15 करोड़), बैंगलोर , 2021
बेन स्टोक्स (14.5 करोड़), राइजिंग सुपरजायंट , 2017

आयपीएल 2024 चे सर्वात महागडे खेळाडू

पैट कमिंस-  20 करोड़ 50 लाख (सनराइजर्स हैदराबाद)
रोवमेन पॉवेल  7.40 करोड़ (राजस्थान)
हर्षल पटेल 11.75 करोड़ (पंजाब किंग्स)
 


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: