Friday, May 17, 2024
HomeIPL CricketIPL 2023 | सामन्यादरम्यान प्रेक्षकांची जोरदार मारामारी…पाहा VIDEO

IPL 2023 | सामन्यादरम्यान प्रेक्षकांची जोरदार मारामारी…पाहा VIDEO

Share

IPL 2023 : सध्या आयपीएल सामन्याची धूम सुरु असून चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आतापर्यंत जवळपास सर्वच सामन्यांमध्ये स्टेडियम खचाखच भरले होते. हे सामने आणि त्यांचे आवडते खेळाडू पाहण्यासाठी लोक विक्रमी संख्येने स्टेडियममध्ये पोहोचत आहेत. मात्र, कधी-कधी आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूला पाठिंबा देताना आपसात मारामारीही होते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहत्यांमध्ये लाथा-बुक्क्यानी मारहाण होत आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम (पूर्वी फिरोजशाह कोटला) येथे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान ही लढत सुरु होती.

व्हिडिओमध्ये काही चाहत्यांच्या हातात दिल्ली कॅपिटल्सचा झेंडा दिसत होता. मारामारीदरम्यान पाच ते सहा जण एकमेकांना भिडले. ही भांडणे कशामुळे झाली हे समजू शकले नसले तरी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नंतर काही लोकांनी येऊन हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले.

मॅचबद्दल बोलायचे तर डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलच्या 16व्या हंगामात सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. शनिवारी (२९ एप्रिल) घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादने त्याला नऊ धावांनी पराभूत केले. या विजयासह हैदराबाद संघाने दिल्लीविरुद्ध सलग पाच पराभवांचा क्रम खंडित केला आहे.

सनरायझर्सने 2020 मध्ये दिल्लीवर शेवटचा विजय मिळवला होता. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी 20 षटकांत 6 गडी गमावून 197 धावा केल्या. अभिषेक शर्माने 36 चेंडूत 67 धावा, हेनरिक क्लासेनने 27 चेंडूत 53 धावा केल्या. मिचेल मार्शने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 20 षटकांत 6 गडी गमावून 188 धावाच करू शकला. फिलिप सॉल्टने 35 चेंडूत 59 आणि मिचेल मार्शने 39 चेंडूत 63 धावा केल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला खातेही उघडता आले नाही. मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: