Thursday, May 2, 2024
Homeराज्य६ ऐवजी मिळणार १२ हजार..! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ...

६ ऐवजी मिळणार १२ हजार..! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली…

Share

निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी येणार १२ योजना

अकोला – अमोल साबळे

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना सर्वांत मोठा गेम चेंजर शेतकयांसाठी एकापाठोपाठ सुमारे १२ योजना आणण्याची तयारी सुरू आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून वाढवून दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये करण्याची शक्यताही आहे. घोषणा करण्याची

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी केंद्र सरकारने आपला पेटारा खुला करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांसाठी ३७०००० कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत खरीप व रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचीही ५०,००० प्रत्येक शेतकऱ्याला मिळत असल्याचे केंद्रीय खत व रसायनमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले मानत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत १२ कोटी शेतकऱ्यांना रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आहे.

किसान सन्मान निधी, खत सबसिडी, एमएसपीमध्ये वाढ, सिंचन प्रकल्पासाठीचा निधी व अन्य मदत याद्वारे देण्यात येत आहे. देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम दिल्यास प्रत्येक शेतकऱ्याला ५२ हजार रुपयांपेक्षा जास्त होतात. निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांसाठी एकापाठोपाठ येणार १२ योजना श्रीश्री रविशंकर व सद्गुरु सांगताहेत शेतीच्या पद्धती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १८ हजार?

६३०००० कोटी रुपये दिवाळीत किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम दुप्पट म्हणजेच १२ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने ही वर्षाला ६ हजार रुपये शेतकन्यांना देण्याची घोषणा केल्याने महाराष्ट्रातील शेतकयांच्या खात्यात एकत्रित १८ हजार रुपये येतील. अल्पभूधारक शेतकयांसाठी केंद्र सरकार लवकरच एक योजना आणणार असून, यात त्यांना सबसिडी देण्याची व्यवस्था असेल.

केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, देशात शेती सुधारण्यासाठी जमिनीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व पृथ्वीला वाचविण्यासाठी केंद्र सरकार आध्यात्मिक गुरूंची मदत घेत आहे.

संत श्रीश्री रविशंक वसंत सद्गुरूंचा सल्ला व मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने रासायनिक उर्वरकांचा शेतीतील वापर बंद करण्याची व जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याची योजना तयार केली आहे.

युरिया सबसिडी योजना मार्च २०२५पर्यंत सुरु राहणार

सध्याची युरिया सबसिडी योजना मार्च २०२५ पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या योजनेत युरिया सबसिडीवर ३.७० लाख कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.

सरकार शेतकऱ्यांना खूश का करतेय?

विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनापासून केंद्र सरकारच्या प्रतिमेवर देशातच नव्हे तर जगभरात परिणाम झाला आहे. तथापि, शेतकरी आंदोलनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपवर याचा जास्त परिणाम झालेला दिसून आला नाही.

तरीही केंद्र सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करु इच्छित आहे. त्यासाठीच शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी अनेक योजना विवरणकीच्या वर्षात याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: