Homeराज्यमुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवात इंदिरा गांधी महाविद्यालयाचे सुयश...

मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक युवा महोत्सवात इंदिरा गांधी महाविद्यालयाचे सुयश…

Share

विभागस्तरीय स्पर्धेत पटकावली ८ पारितोषिके

धीरज घोलप

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने आयोजित ५६व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवांतर्गत विभाग क्र.२ च्या (शीव ते मुलुंड, जी.टी.बी. नगर ते वाशी व नवी मुंबई या क्षेत्रामध्ये असणारी महाविद्यालये) स्पर्धा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धांमध्ये ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या शिक्षकमित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे शैक्षणिक संकुल, पार्कसाईट, विक्रोळी (पश्चिम) येथील इंदिरा गांधी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी ८ पारितोषिके पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे.

वैयक्तिक स्पर्धा प्रकारात महाविद्यालयाच्या अदिती पोपट सातपुते हिने भारतीय शास्त्रीय वाद्यवादन (स्वर वाद्य) स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ऋषिकेश निवृत्ती आंद्रे याने क्ले मॉडेलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक व कोलाज स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक, एकपात्री अभिनय (हिंदी) स्पर्धेत प्रतीक संतोष घाडगे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. याशिवाय समूह स्पर्धा प्रकारांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय समूहगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक, समूह मूक अभिनय (माईम) स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर समूह लोकनृत्य व स्किट (हिंदी) या स्पर्धांमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांची निवड मुंबई विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवासाठी झाली आहे.

सुयशप्राप्त विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि महाविद्यालयाच्या युवा महोत्सवाचे समन्वयक सुविद्य गावंड यांचे संस्थेच्या अध्यक्ष पुष्पलता बाळासाहेब म्हात्रे व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र महादेव म्हात्रे यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: