Thursday, May 9, 2024
Homeराज्यभारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीची निवड...

भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीची निवड…

Share

रामटेक – राजु कापसे

भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पूर्व तर्फे कल्याणमित्र बौद्ध विहार शितलवाडी येथे रामटेक तालुका व शहर कार्यकारिणीची निवड सभा घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तुलाराम रामटेके (अध्यक्ष भा.बौ.म.ना.जि.पूर्व), प्रमुख मार्गदर्शक भीमराव फुसे (जिल्हा संघटक, भा.बौ. महासभा), विशेष पाहुणे प्रा.डॉ. मुकुंद मेश्राम (जिल्हा संघटक, भा.बौ.म.ना.जि.), आनंद सायरे (संस्कार उपाध्यक्ष, भा.बौ.म.ना.जि.प.),

पूनादास गजभिये (उपाध्यक्ष,भा.बौ.म.ना.जि.पू.), अरविंद बोरघाटे (सरचिटणीस, भा.बौ.म.ना.जि.प.), राजू भिवगडे (अध्यक्ष, भा.बौ.म. मौदा तालुका), जयश्रीताई बावनगडे (जिल्हा महिला निमंत्रक, भा.बौ.म.ना.जि.पू.), प्रा. अनिकेत मून, मनीष खोब्रागडे (अध्यक्ष, रामटेक तालुका वंबआ) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव (संस्कार) साक्षोधन कडबे यांनी केले.

यावेळी रामटेक तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुमेध गजभिये, उपाध्यक्ष कैलास सहारे, संघपाल डोंगरे, सरचिटणीस विनोद फुलझेले, कोषाध्यक्ष डॉ. अनिल गजभिये यांची निवड करण्यात आली तसेच शहर अध्यक्षपदी सूरज भिमटे, उपाध्यक्ष विक्रांत नंदेश्वर, सरचिटणीस भाऊराव भेलावे, कोषाध्यक्ष राहुल जोहरे यांची निवड करण्यात आली.

कल्याण मित्र बौद्ध विहार समितीचे रुस्तम मोटघरे यांनी सभेचे संचालन केले तर भाऊराव भेलावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कल्याण अडकणे, चंद्रभान गजभिये, वेणुधर भिमटे, सोपाक कडबे, अशोक गणवीर, शुभाताई थुलकर, दीपाताई चव्हाण यांचेसह तालुक्यातील बहुसंख्य बौद्ध उपासक-उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: