Thursday, May 2, 2024
HomeT20 World CupIND vs BAN | आजच्या सामन्यात विराट कोहली १६ धावा करताच विश्वविक्रम...

IND vs BAN | आजच्या सामन्यात विराट कोहली १६ धावा करताच विश्वविक्रम करणार…

Share

IND vs BAN : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये स्टार फलंदाज विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आहेत, त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. बुधवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला विश्वविक्रम करण्याची मोठी संधी असेल. कोहली T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यापासून फक्त 16 धावा दूर आहे.

बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी विराट कोहलीच्या बॅटमधून धावा काढणे खूप महत्त्वाचे आहे. अॅडलेडमध्ये खेळल्या जाणार्‍या या सामन्यात विराट कोहली 16 धावा करताच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोहली अवघ्या 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, या सामन्यात तो T20 विश्वचषकात 1000 धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.

यासह विराट कोहलीने T20 विश्वचषकात 1001 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 919 धावा आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हे दोन्ही भारतीय फलंदाज अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.

T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने 24 सामन्यांमध्ये 22 डावांमध्ये 83.41 च्या सरासरीने 1,001 धावा केल्या आहेत. नाबाद ८९ ही त्याची स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या बॅटने 12 अर्धशतके आहेत. स्पर्धेतील सर्वकालीन सर्वोच्च धावा करणारा श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धने आहे, ज्याने 31 सामन्यांत 39.07 च्या सरासरीने 1,016 धावा केल्या आहेत. वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्येसह त्याच्या बॅटमध्ये एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: